मुलीच्या मदतीने महिलेने केला सवतीचा खून, 32 वेळा भोसकून मृतदेह जंगलात फेकला

मुलीच्या मदतीने महिलेने केला सवतीचा खून, 32 वेळा भोसकून मृतदेह जंगलात फेकला

बेलापूरमधून खुनाची एक भयानक घटना समोर येत आहे. आई आणि मुलीने मिळून गोरेगावमधील एका 33 वर्षीय महिलेची हत्या केल्याची घटना घडली आहे. 32 वेळा भोसकून या महिलेची हत्या करण्यात आली.

  • Share this:

नवी मुंबई, 27 फेब्रुवारी : बेलापूरमधून खुनाची एक भयानक घटना समोर येत आहे. आई आणि मुलीने मिळून गोरेगावमधील एका 33 वर्षीय महिलेची हत्या केल्याची घटना घडली आहे. 32 वेळा भोसकून या महिलेची हत्या करण्यात आली. बेलापूरमधील शहबाझ गावातून या दोघींना अटक करण्यात आली आहे. 42 वर्षीय आरोपी महिला मृत महिलेच्या नवऱ्याची पूर्वपत्नी होती. तर दुसरी आरोपी असणारी 21 वर्षांची महिला त्या दोघांची मुलगी होती. मुलीच्या मित्राच्या मदतीने त्यांनी गोरेगावमध्ये राहणाऱ्या महिलेचा धारधार शस्त्राने भोसकून निघृण खून केला. तिघांनी मिळून या महिलेला 23 फेब्रुवारीच्या संध्याकाळी रिक्षामध्ये कोंबलं. तिच्या शरिवार 32 ठिकाणी वार करत भोसकून हत्या करण्यात आली.  एवढचं करून त्यांचं क्रुरकर्म थांबलं नाही, तर त्यांनी तिचा मृतदेह उरणजवळील टाकी गावाच्या नजीक असणाऱ्या जंगलात फेकला. पडझड झालेल्या भागात तिचा मृतदेह फेकण्यात आला होता. पोलिसांनी आई-मुलीला अटक केली असून तिसरा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या तिसऱ्या आरोपीसोबत आरोपी मुलीचं अफेअर असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचा-सुट्टीवर आलेल्या जवानाने केली पत्नीची हत्या, 2 वर्षापूर्वीच झाला होता प्रेमविवाह)

मृत महिलेचा पती ऑटो चालवण्याचा व्यवसाय करतो. या इसमाबरोबर तिने 5 वर्षांपूर्वी लग्न केलं होतं आणि त्यांना मुलबाळ नाही आहे. मृत महिलेला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगा आहे. तिचा पहिला नवरा दारुच्या व्यसनाधीन होता आणि काही वर्षांपूर्वीच तो तिला सोडून गेला. आरोपी महिला मृत महिलेच्या नवऱ्याची पूर्वपत्नी आहे. उरण पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक अतुल आहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामोठे याठिकाणी मृत महिला आणि तिचा नवरा वास्तव्य करत होते आणि ती सँडहर्स्ट रोड याठिकाणी बालआश्रममध्ये काम करत होती. मृत महिलेच्या भावाच्या मदतीने तिच्या नवऱ्याचा शोध लावण्यात आला. पनवेल उपविभागीय रुग्णालयातील फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या माहितीनुसार या महिलेवर 32 वार झाले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेवर एकाच शस्त्राने वार केले आहेत.

(हेही वाचा-नांदेडजवळ 5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून बलात्कार)

पोलिसांच्या माहितीनुसार मृत महिला आणि आरोपी महिलेमध्ये वाद होता. मृत महिलेचा पती तिच्यावर खूप पैसे खर्च करत असल्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यामध्ये खटके उडत असत.उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी सांगितले की, तीन जणांविरूद्ध खून आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरण पोलिसांनी आरोपींची नावं उघड न करण्याचा सूचना दिल्या आहेत. जेणेकरून खुनाच्या तपासात अडथळा येणार नाही. या दोन्ही आरोपींना सध्या सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2020 03:14 PM IST

ताज्या बातम्या