आईची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

आईची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

त्या आईने मुलांना काहीही कळू न देता जवळ घेतलं आणि विहिरीत उडी मारली. पावसामुळे विहिरीत भरपूर पाणी होतं. त्यामुळे सर्व मायलेकरं पाण्यात बुडाली.

  • Share this:

हरीष दिमोटे, शिर्डी 13 ऑक्टोंबर :  संगमनेर तालुक्यातलं पिंपळगाव आज एका घटनेनं हादरून गेलंय. एका महिलेनं आपल्या दोन लहानग्यांना घेऊन विहिरीत उडी टाकून आत्महत्ये केली. काही वेळानंतर शेतात काम करणाऱ्या लोकांना विहिरीत मृतदेह तरंगत असल्याचं दिसलं तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती देऊन सगळ्यांना विहिरीबाहेर काढलं. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून त्या महिलेच्या सासरच्या काही लोकांना ताब्यात घेतलंय. आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव माथा गावातीली ही घटना आहे. राणी लाहांगे (25) यांनी त्यांच्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ओंकार लाहंगे(6) आणि पायल लाहंगे (3) अशी त्यांच्या दोन मुलांची नावं आहेत.

नागपूरचा मोस्ट वॉन्टेड गुंड संतोष आंबेकरला पोलिसांचा दणका, काढली 'धिंड'

शेतात जातो असं सांगून राणी या दोनही मुलांना सोबत घेऊन बाहेर पडल्या. घरातून त्या शेतात आल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत ओंकार आणि पायल ही दोन मुलं होती. त्यांनी मुलांना काहीही कळू न देता जवळ घेतलं आणि विहिरीत उडी मारली. पावसामुळे विहिरीत भरपूर पाणी होतं. त्यामुळे सर्व मायलेकरं पाण्यात बुडाली. राणी यांना घरात नीट वागवलं जात नव्हतं. त्यांचा छळ करण्यात येत होता असा आरोप राणीच्या आई वडिलांनी केलाय. त्यामुळे पोलिसांनी राणीच्या सासरच्या लोकांना ताब्यात घेतलंय.

आदित्य ठाकरेंसोबत काम करण्यास तयार, नितेश राणेंनी पुढे केला मैत्रीचा हात

महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. मात्र महिलांविरुद्धच्या अत्याचारांमध्ये घट झालेली नाही उलट दिवसेंदिवस संख्या वाढत असल्याने सामाजिक संघटनांनी चिंता व्यक्त केलीय. महिला आयोगाने प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि राणीला न्याय मिळून द्यावा अशी मागणीही केली जातेय. राणी आणि तिच्या दोन लहानग्या मुलांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राणीच्या  आईवडिलांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2019 07:14 PM IST

ताज्या बातम्या