मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! लग्नासाठी खर्च करावा लागेल म्हणून निर्दयी बापानं उचललं टोकाचं पाऊल; पोटच्या मुलीचा घेतला जीव

धक्कादायक! लग्नासाठी खर्च करावा लागेल म्हणून निर्दयी बापानं उचललं टोकाचं पाऊल; पोटच्या मुलीचा घेतला जीव

मामानं सांगितलं, की या मुलीच्या लग्नाचा खर्च करावा लागू नये म्हणून तिच्या बापानं आणि सावत्र आईनं तिची हत्या (Father Killed Daughter) करून मृतदेह कालव्यात फेकला

  • Published by:  Kiran Pharate
पाटणा 21 ऑगस्ट : एक अत्यंत हृदयद्रावक आणि नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यात एका बापानं आणि आईनं आपल्या मुलीची हत्या (Father Killed Daughter) करून तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिला. ही घटना बिहारच्या (Bihar) भोजपूर जिल्ह्यातील आहे. जिल्ह्यातील अजिमाबाद पोलिसांनी (Police) भीमपुरा गावातील कालव्याजवळून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अंघोळीसाठी बाथरूममध्ये जाताच महिलेला दिसलं भलतंच; पतीचा कारनामा पाहून हादरली या मुलीच्या हत्येचा (Murder of Minor Girl) आरोप तिच्या मामानं मुलीच्याच वडिलांवर आणि सावत्र आईवर लावला आहे. दोन दिवसांआधीच मृत मुलीच्या मामानं ती बेपत्ता असल्यानं संशय व्यक्त करत तिच्या वडिलांविरोधात आणि सावत्र आईविरोधात तक्रार दाखल केली होती. मामानं सांगितलं, की या मुलीच्या लग्नाचा खर्च करावा लागू नये म्हणून तिच्या बापानं आणि सावत्र आईनं तिची हत्या करून मृतदेह कालव्यात फेकला. मृत मुलीचा अनेकदा छळ केला गेल्याचंही मुलीच्या मामानं सांगितलं. जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकली 15 वर्षांची राबिता;आईच्या उत्तरानंतर केली आत्महत्या 16 वर्षीय मृत मुलीचं मान दिव्या कुमारी असून ती तीन दिवसांपूर्वी घरातून अचानक गायब झाली. तिच्या मृतदेहाची ओळख न पटल्यानं पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी आरा येथे पाठवला. याचवेळी घटनास्थळावरील फोटो मृत मुलीच्या मामापर्यंत पोहोचला. यानंतर तिचा मामा रुग्णालयात पोहोचला आणि ही दिव्याच असल्याचं सांगितलं. मुलीच्या मामानं दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीला कोणीही भाऊ किंवा बहीण नाही आणि तिच्या वडिलांनी 13 वर्षांपूर्वी तिच्या आईचीदेखील अशाच प्रकारे हत्या केली होती. पोलिसांनी सध्या मुलीच्या सावत्र आईला ताब्यात घेतलं आहे. तर, आरोपी बाप अद्याप फरार आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Murder news

पुढील बातम्या