• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • 10 दिवसांत होत्याच नव्हतं झालं; पतीच्या आत्महत्येनंतर बायको अन् मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

10 दिवसांत होत्याच नव्हतं झालं; पतीच्या आत्महत्येनंतर बायको अन् मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

एका पॉश सोसायटीत राहाणाऱ्या महिलेनं आणि तिच्या मुलीनं आत्महत्या (Mother and Daughter Commit Suicide) केली असल्याचं प्रकरण समोर आलं आहे. याआधी 6 जुलै रोजी एका हॉटेलमध्ये वीना यांचे पती हरी यांनी आत्महत्या केली होती.

 • Share this:
  चंदीगड 17 जुलै : एका पॉश सोसायटीत राहाणाऱ्या महिलेनं आणि तिच्या मुलीनं आत्महत्या (Mother and Daughter Commit Suicide) केली असल्याचं प्रकरण समोर आलं आहे. घटनेतील 46 वर्षीय महिलेचं नाव वीना शेट्टी असं असून 24 वर्षीय मुलीचं नाव यशिका असं आहे. याआधी 6 जुलै रोजी एका हॉटेलमध्ये वीन शेट्टी यांचे पती हरी शेट्टी यांनी विष प्राशन (Consumed Poison) करत आत्महत्या केली होती. ही घटना हरियाणाच्या गुरुग्राम (Gurugram) शहरातील आहे. हरी शेट्टी टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम करत होते. तर वीणा एका खासगी कंपनीत सेल्स विभागात कार्यरत होती. जानेवारी 2021 मध्येच त्यांचं कुटुंब वर्धमान मंत्रा सोसायटीत राहण्यासाठी आले होते. पोलीस हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, की आत्महत्येमागं कोणतं कौटुंबीक कारण आहे की इतर काही दबावात तिघांनी हे पाऊल उचललं आहे. Right to Love चा कुटुंबाकडून विरोध;12वीच्या विद्यार्थिनीचं उचललं धक्कादायक पाऊल आई आणि मुलीच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच गुरुग्राम पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस याठिकाणी पोहोचले असता फ्लॅटमध्ये वीणा आणि त्यांची मुलगी यशिकाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. घटनास्थळी सुसाईड नोटही आढळलेली नाही. सुरुवातीच्या तपासात असं समोर आलं आहे, की हरी शेट्टी आपल्या कुटुंबीयांसोबत इथेच राहात असे. वर्धमान सोसायटीच्या मॅनेजरचं म्हणणं आहे, की हे कुटुंब जानेवारीत याठिकाणी शिफ्ट झालं होतं. त्यांना दोन मुली होत्या आणि या दोघीही जुळ्या होत्या. एक मुलगी एमबीए करत होती तर दुसरी वकिलीचे शिक्षण घेत होती. 6 जुलै रोजी हरी शेट्टी यांनी आत्महत्या केली होती. यानंतर आता एमबीए करणारी मुलगी यशिका आणि पत्नी वीणा यांनीही आत्महत्या केली. पत्नी अन् मुलीनेच रचला कट; सुपारी देऊन पोलीस कर्मचाऱ्याचा केला गेम मॅनेजर अशोक वर्मा यांचं असं म्हणणं आहे, की जेव्हा ते इथे पोहोचले तेव्हा वीणा शेट्टी यांचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला. तर, मुलगी यशिका बेडरूममध्ये होती. त्यांनी तात्काळ पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. यानंतर मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू झाला. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: