मायलेकी रात्री उशिरा रेल्वे स्थानकावर पोहोचल्या, पुढे जे घडले ते पाहून पोलीसही हादरले

मायलेकी रात्री उशिरा रेल्वे स्थानकावर पोहोचल्या, पुढे जे घडले ते पाहून पोलीसही हादरले

मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर रात्री 11 वाजता ही घटना घडली आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली.

  • Share this:

मूर्तिजापूर, 05 ऑक्टोबर : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाजवळ मध्यरात्री दोन महिलांनी रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत महिला मायलेकी असल्याचं सांगण्यात आले आहे.

दैनिक सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर रात्री 11 वाजता ही घटना घडली आहे. दोन्ही मृत महिलांची अद्याप ओळख पटली नाही. या दोन्ही महिलांचे वय वर्षे 55 आणि वय वर्षे 30 आहे.  या दोन्ही महिलांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रेल्वे स्थानकावर पोहोचल्या होत्या. दोन्ही महिला रेल्वे रुळावर झोपल्या. त्यानंतर भरधाव रेल्वेखाली दोघांचा जागीच जीव गेला.

"सुशांतची हत्या झाली होती"; AIIMS च्या डॉक्टरांची AUDIO CLIP लीक

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. दोन्ही महिलांचे मृतदेह ताब्यात घेतले. शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. पोलिसांनी मूर्तिजापूर स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. तेव्हा या दोन्ही महिला पश्चिम दिशेने येऊन प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर बसलेल्या दिसल्या.

त्यानंतर रेल्वे गाडी येण्याच्या काही मिनिटांपूर्वी दोन्ही महिला स्थानकावरून उठल्या आणि रुळावरून जाऊन झोपल्या. रेल्वे भरधाव वेगात असल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दोघी मायलेकी असल्याची चर्चा होती.

कंगनाच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पूर्ण, संजय राऊतांनी दिले उत्तर

पोलिसांनी दोन्ही महिलांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. मृत महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या दोन्ही महिलांनी रेल्वे रुळावर झोपून का आत्महत्या केली, याचा तपास ठाणेदार किरण कालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र जळमकर व हवालदार शेख कलीम करत आहेत.

Published by: sachin Salve
First published: October 5, 2020, 2:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading