पाटना, 16 डिसेंबर : बिहारमधील (Bihar News) पाटनामध्ये संपत्तीच्या वादातून भयावह घटना (Crime News) समोर आली आहे. साधारण 4 कोटी रुपयांसाठी आई व मुलाला खोलीत बंद करून जिवंत जाळण्यात आलं. या खळबळजनक घटनेनंतर परिसरात घबराट पसरली आहे. हे कृत्य त्यांच्या पुतणीने केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर तरुणीला पकडून लोकांनी मारहाण केली व पोलिसांच्या स्वाधीन केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, साधारण चार कोटी रुपयांसाठी आई-मुलाला खोलीत बंद करून जिवंत जाळण्यात आलं. ही घटना बिहारमधील नौबतपूर येथील कर्णपूरा गावात घडली. पोलिसांनी या प्रकरणात दोन महिलांना अटक केली आहे. महिलेच्या पतीचा दहा वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. या संपत्तीवरुन अनेक दिवसांपासून वाद सुरू होता.
मृत्यू झालेल्या महिलेचं नाव शांती देवी (70) आणि त्यांनी दत्तक घेतलाला मुलगा अविनाश कुमार (12) यांचा समावेश आहे. सांगितलं जात आहे की, पैसे मागण्यासाठी आलेली पुतणी माधुरी देवी (32) हिला जेव्हा पैसे दिले नाही तर तिने रॉकेट ओतून त्यांना जाळून टाकलं. आग लागल्यानंतर दोघेही जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत होते. यादरम्यान माधुरीने त्या दोघांना एका खोलीत बंद करून दार बाहेरून लावून घेतलं. तडफडत त्या दोघांचाही मृत्यू झाला. खोलीत केवळ राखच सापडली. यानंतर आजूबाजूचे लोकही जमा झाले. यावेळी संतापलेल्या स्थानिकांनी माधुरीला मारहाण सुरू केली.
हे ही वाचा-लेकाच्या भवितव्यासाठी आई-वडिलांचं पाऊल; 15 वर्षांच्या मुलाने झोपतच केली हत्या
गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर माधुरीला पोलिसांनी अटक केली. याशिवाय माय-लेकांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रवाना करण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.