अशितोष अस्थाना (नवी दिल्ली), 31 मार्च : रात्रीची भयान शांतता, गर्द झाडी आणि रिकामे रस्ते अशातच घरातून येणारे ओरडण्याचे आवाज या अशा अनेक भयावह गोष्टी आपण ऐकत आलो आहे. पण हे खरंच असं असत का? एखादा भूत बंगला असावा असे तुम्हाला वाटते का? वर्षानुवर्षे बंद असलेल्या घरात कोणाच्या तरी किंकाळ्यांचा आवाज तुम्ही ऐकला असाल? अशीच एक घटना राजधानी दिल्लीच्या एका भागात असलेल्या घराबाबत लोकांचा वर्षानुवर्षे असाच विचार आहे. आता जरी हे घर अफवा, भीती आणि दहशतीपासून दूर गेले असले तरी एक काळ असा होता जेव्हा हे घर दिल्लीतील सर्वात भयानक ठिकाण मानले जात होते.
ही गोष्ट आहे ग्रेटर कैलास-1 मध्ये असलेल्या घर क्रमांक W-3 मध्ये असा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. ज्यांनी दिल्ली शहराला भेट दिली आहे त्यांना माहित असेल की ग्रेटर कैलास (घर क्रमांक W-3, ग्रेटर कैलाश) हा दिल्लीचा एक अतिशय पॉश परिसर आहे. पण अशा भागातही भूतांच्या कथा प्रचलित असू शकतात, ही धक्कादायक बाब आहे. या घरात एका जोडप्याची हत्या करण्यात आली होती, त्यानंतर ते पछाडलेले मानले जात होते.
इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव! विहीर कोसळून देवाच्या दारात 35 जणांनी गमावला जीव
रिपोर्ट्सनुसार, 1986 मध्ये यदू कृष्णन कौल आणि मधु कौल यांची हत्या केली होती. त्याला त्यांची मालमत्ता बळकावायची होती. यामुळे त्याने गळा चिरून त्यांचा मृतदेह जमीनीत असलेल्या टाकीत लपवून ठेवला होता. काही दिवसांनी मृतदेह कुजायला लागल्यावर शेजाऱ्यांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. या घरात राहणाऱ्या दाम्पत्याला अपत्य नव्हते, तसेच घरावर हक्क सांगू शकतील असे कोणतेही जवळचे कुटुंबीय नव्हते, त्यामुळे घर वर्षानुवर्षे बंद होते.
दरम्यान या घरात 27 वर्षांपासून घराशी संबंधित अनेक धक्कादायक गोष्टी परिसरात धुमाकूळ घालू लागल्या. कोणी दावा केला की त्याने घरातून रडण्याचे आवाज ऐकले होते, तर कोणी ओरडण्याचे आवाज ऐकले होते. घरामुळे परिसरात बराच काळ भूतांची दहशत कायम होती असे बोलले जायचे.
पण नंतर हे घर गुप्ता कुटुंबीयांनी विकत घेतले आणि येथे स्थलांतरित होण्यापूर्वी त्यांनी त्यात ३ दिवस हवन केले. कुटुंब इथे राहत नाही, कधी कधी सुट्टीसाठी येतात, पण घराची भीती आजही लोकांच्या मनात कायम आहे. संडे गार्डियन वेबसाइटच्या वृत्तानुसार, त्या वेळी सहायक पोलिस आयुक्त असलेले दीपक मिश्रा यांनी दावा केला होता की, भुतांसंबंधीच्या गोष्टी मूर्खपणाच्या आहेत.
Shocking : 250 प्रवासी घेऊन जाणाऱ्या जहाजाने समुद्रात घेतला पेट; 31 मृत्यू, 18 जणांचा शोध सुरू
घरात असा कोणताही प्रकार नाही. ही घटना चोरी करण्यास गेलेल्याांनी केली आहे. यातील गुन्हेगारही सापडले आहेत त्यांच्यावर आरोपपत्रही दाखल झाले आहे. पोलीस काहीही म्हणोत, पण घराशेजारी राहणार्या लोकांचा दावा आहे की या दाम्पत्याचा आत्मा याच घरात राहतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Delhi, Local18