Home /News /crime /

मॅट्रिमोनियल साइट्सवर Google चा मॅनेजर असल्याचं भासवून 50 पेक्षा अधिक मुलींना हातोहात फसवलं

मॅट्रिमोनियल साइट्सवर Google चा मॅनेजर असल्याचं भासवून 50 पेक्षा अधिक मुलींना हातोहात फसवलं

या माणसाने आतापर्यंत तब्बल 50 पेक्षा अधिक मुलींना लुबाडलं आहे. तसेच स्वतः ला गुगल (google) कंपनीमधील एचआर मॅनेजर (HR manager) असल्याचं सांगून अनेक मुलींचं लैंगिक शोषणही (Sexual abuse) केलं आहे.

    अहमदाबाद, 19 जानेवारी: मॅट्रीमोनियल साइट्सवरून (matrimonial sites) अनेक मुलींना गंडा घालणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सायबर क्राइम ब्रँँचने नुकतीच अटक केली आहे. या आरोपी व्यक्तीनं आतापर्यंत तब्बल 50 पेक्षा अधिक मुलींना लुबाडलं आहे. तसेच स्वतः ला गुगल कंपनीमधील एचआर मॅनेजर असल्याचं सांगून अनेक मुलींचं लैंगिक शोषणही केलं आहे. एका पीडित युवतीने या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर या तरुणाचं काळंबेर बाहेर आलं आहे. सायबर क्राइमच्या पथकाने आरोपीला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने मॅट्रेमोनियल साइट्सवर अनेक बनावट खाती बनवली होती. तिथे तो स्वतःला गुगल कंपनीचा एचआर मॅनेंजर असल्याचं सांगत असे. शिवाय तो इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM)अहमदाबाद येथून उत्तीर्ण असल्याचं सांगून अनेक बड्या घरातील मुलींना आपल्या जाळ्यात ओढत होता. मुलींचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने सर्व प्रकारचे बनावट कागदपत्रं तयार करून घेतली होती. त्यानं केवळ बनावट डिग्रीचं तयार केली नव्हती, तर त्याला 40 लाखांचं वार्षिक पॅकेज असल्याच्या भुलथापाही त्याने मॅट्रेमोनियल साइट्सवर टाकल्या होत्या त्यामुळे बड्या घरातील मुली सहजपणे त्याच्या जाळ्यात फसत होत्या. आरोपी या साइट्सच्या आधारे अनेक श्रीमंत मुलींना लक्ष्य करायचा. त्यांना कुटुंबियांचे फोटो आणि बनावट कागदपत्रं दाखवून तो मुलींचा विश्वास संपादन करायचा, त्यानंतर काही कारणं देवून त्यांची आर्थिक फसवणूक करायचा. त्याच बरोबर त्याने अनेक मुलींना लग्नाचं आमिष दाखवून त्यांचं लैंगिक शोषणही करायचा. त्यानंतर तो अचानक गायब व्हायचा. या प्रकरणात, एका युवतीच्या तक्रारीवरून अहमदाबाद पोलिसांच्या सायबर सेलने या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संदीप शंभूनाथ मिश्रा असं या आरोपीचं खरं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्याने मॅट्रेमोनियल साइटवर, विहान शर्मा, प्रतीक शर्मा, आकाश शर्मा अशा विविध नावांनी त्याचं प्रोफाइल बनवलं होतं. पोलिसांनी आरोपीकडून 30 हून अधिक सिमकार्ड, 4 फोन, बनावट आयडी कार्ड ताब्यात घेतले आहेत. संबंधित आरोपीनं अहमदाबाद उज्जैन, ग्वालियर, गोवा, छत्तीसगडसह आदी राज्यातील मुलींना त्यानं आपल्या जाळ्यात ओढलं होतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cyber crime

    पुढील बातम्या