• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • धक्कादायक! विटेनं डोकं फोडून माकडानं केली युवकाची हत्या

धक्कादायक! विटेनं डोकं फोडून माकडानं केली युवकाची हत्या

नवी दिल्लीमध्ये राहणाऱ्या मोहम्मद कुर्बानचा माकडाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. घराच्या छतावरुन माकडानं कुर्बानवर वीट फेकली होती

 • Share this:
  नवी दिल्ली 21 ऑक्टोबर : भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये रस्त्यापासून अगदी छोट्या छोट्या गल्ल्यांपर्यंत अनेक प्राणी फिरताना दिसतात. रस्त्यावर गाय, म्हैस, डुक्कर, कुत्रा, माकड असे वेगवेगळे प्राणी सर्रास फिरताना दिसतात. यांच्यामुळे अनेक दुर्घटनाही घडतात. अनेकदा या प्राण्यांमुळे अपघातही होतात. अनेकदा कुत्रे लोकांवर हल्ला (Animal Attack) करतात. मागील काही काळापासून देशाच्या अनेक भागातून माकडांनी केलेल्या हल्ल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. असंच एक प्रकरण आता दिल्लीमधून (Delhi) समोर आलं आहे. यात एका व्यक्तीचा माकडानं केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे (Monkey Killed Man). आई-वडील शेतात जाताच एकट्या मुलीवर साधला डाव; रेप आणि खुनाच्या घटनेनं नगर हादरलं! द इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार, नवी दिल्लीमध्ये राहणाऱ्या मोहम्मद कुर्बानचा माकडाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. घराच्या छतावरुन माकडानं कुर्बानवर वीट फेकली होती. ही वीट कुर्बानच्या डोक्यावर लागली आणि तो जागीच कोसळला. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या घराच्या छतावरुन हा हल्ला केला गेला ते घर ओमप्रकाश मिश्रा नावाच्या व्यक्तीचं आहे. आपल्या घरावरील टाक्या माकडांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी तो यावर विटा ठेवत असे. माकडानं टाकीवरील हिच वीट उचलून हल्ला केला. लाईव्ह येत सोशल मीडिया स्टारनं घेतलं विष, मग स्वतःच रुग्णवाहिकाही बोलावली पण... याशिवाय माकडानं आणखी एक वीट फेकली होती, ही शेजारच्या छतावर जाऊन पडली. त्या छतावर कोणीही नसल्यानं दुसरी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, माकडानं मोहम्मदवर निशाणा साधला नव्हता. हे माकड केवळ टाकीवरुन वीट खाली फेकत होतं. खालून जात असतानाच ही वीट मोहम्मदच्या डोक्यावर पडली आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना ज्या भागात घडली तिथे खूप मोठं मार्केट आहे. आसपासच्या लोकांनी सांगितलं की परिसरात माकडाच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ही माकडे आक्रमक होऊन माणसांवर हल्ला करू लागली आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: