Home /News /crime /

बहिणीने मागितले पैसे; भावाने पाठवलं विष, दु:खी कुटुंबाने केली आत्महत्या

बहिणीने मागितले पैसे; भावाने पाठवलं विष, दु:खी कुटुंबाने केली आत्महत्या

यानंतर तातडीने त्यांनी आजूबाजूंच्या लोकांसह पोलिसांना माहिती दिली. घरातील पती-पत्नीच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. तातडीने त्यांचे मृतदेह रुग्णालयात हलविण्यात आले. जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

यानंतर तातडीने त्यांनी आजूबाजूंच्या लोकांसह पोलिसांना माहिती दिली. घरातील पती-पत्नीच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. तातडीने त्यांचे मृतदेह रुग्णालयात हलविण्यात आले. जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

लग्नानंतर महिलेसाठी तिचं माहेर हाच एकमेव आधार असतो...मात्र भावाने असं काही केलं की तिने कुटुंबासह आत्महत्या केली

    गुरुदासपूर, 23 डिसेंबर : पंजाबमधील गुरुदासपूरमधून (Punjab) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका कुटुंबीयातील 3 जणांनी विष खाऊन आत्महत्या (Suicide) केली. मृत व्यक्तीच्या मुलाचा आरोप आहे की, त्याच्या आईने आपल्या भावाकडून पैसे मागितले तेव्हा त्याने तिला विष (Poison) पाठवलं. आणि म्हणाले की, कुटुंबासह आत्महत्या कर अन्यथा तो येऊन त्याच्या कुटुंबाची हत्या करेल. ही घटना गुरुदासपूरमधील धारीवाला या भागातील आहे. येथे एका गरजू बहिणीने आपल्या भावाकडून आर्थिक मदत मागितली होती. मात्र मदत न करता या भावाने तिला आत्महत्या करण्याचा सल्ला दिला. ज्यामुळे दुखी झालेल्या बहिणीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन न्यायाची मागणी केली. यानंतर महिलेने आपली 16 वर्षांची मुलगी आणि पतीसोबत विष घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार महिलेचं नाव भारती शर्मा असल्याचे समोर आले आहे. त्या त्यांचा भाऊ प्रदीप शर्मा यांच्यासोबत पैशांची देवाणघेवाण करीत होत्या. सध्या पोलिसांनी या प्रकरणात 10 लोकांच्या विरोधात केस दाखल केली असून तपास सुरू आहे. तर दुसरीकडे मृत महिलेचा मुलगा कुणार शर्मा यांनी सांगितलं की, त्याचं आपले मामासोबत पैशांची देवाण-घेवाण होती. जेव्हा त्याच्या आईने आपल्या भावासोबत पैशांबाबत बोलणी केली तेव्हा त्याच्या मामाने तिला विषारी औषध पाठवलं व विष घेऊन आत्महत्या करण्याचा सल्ला दिला. अन्यथा तो तिच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करेल अशीही धमकी दिली. तेव्हा रात्री कुटुंबातील तिनही सदस्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला व विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. मुलाने आरोप केला आहे की या घटनेमागे त्याचे मामा व त्यांचे साथीदार जबाबदार आहे. त्यांनीच आत्महत्या करण्यासाठी दबाव आणला. त्याने मागणी केली आहे की, मामा व त्याच्या साथीदारांवर कारवाई केली जावी. तर दुसरीकडे या प्रकरणात एसपी हरविंदर सिंह संधू यांनी सांगितलं की, आम्हाला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एकाच कुटुंबातील तिघांनी विष घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यावरुन महिला व तिचे कुटुंब आपल्या भावामुळे त्रस्त असल्याचे समजते. त्यांचं आपल्या कुटुंबासोबत देवाण-घेवाण होती. तीनही मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. आणि मृत महिलेच्या भावासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Sucide

    पुढील बातम्या