मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /'रामलखन' सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्यासोबत घडलं 'जमतारा' कांड, बँक खात्यातून पैसे गायब

'रामलखन' सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्यासोबत घडलं 'जमतारा' कांड, बँक खात्यातून पैसे गायब

'मी जेव्हा दिल्लीला पोहोचलो तेव्हा माझ्या मोबाइलचा मॅसेज बॉक्स चेक केला. तेव्हा मला धक्काच बसला'

'मी जेव्हा दिल्लीला पोहोचलो तेव्हा माझ्या मोबाइलचा मॅसेज बॉक्स चेक केला. तेव्हा मला धक्काच बसला'

'मी जेव्हा दिल्लीला पोहोचलो तेव्हा माझ्या मोबाइलचा मॅसेज बॉक्स चेक केला. तेव्हा मला धक्काच बसला'

मुंबई, 16 जानेवारी : अलीकडेच नेटफ्लिक्सवर सत्य घटनेवर आधारीत जमतारा नावाची सिरीज प्रसिद्ध झाली आहे. फेक कॉलकरून बँक खात्यातील पैसे गायब करणाऱ्या टोळीचा कारनामा यात दाखवण्यात आला आहे. असाच एक किस्सा बॉलिवूडचे अभिनेते आनंद बलराज यांच्याबरोबर घडला आहे. त्यांच्या खात्यातून तब्बल 2 लाख रूपये लंपास करण्यात आले आहे.

नवदीच्या दशकात आनंद बलराज यांनी अभिनेता आणि सहअभिनेता म्हणून कारकिर्द गाजवली होती. आनंद बलराज यांनी नवदीच्या दशकात रामलखन, खलनायक, भाभी, अशा चित्रपटांमध्ये काम केलं होतं. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे भाईजान सलमान खान याने आनंद बलराज यांना मदत केली आहे. त्यानंतर आनंद बलराज यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं. न्यू इअर पार्टीसाठी  आनंद बलराज हे दिल्लीला चालले होते. दिल्लीला पोहोचल्यानंतर त्यांनी मोबाइल चेक असता तब्बल 2 लाख रूपये खात्यातून परस्पर काढले असल्याचं समोर आलं.

आनंद बलराज यांनी सांगितलं की, 'नवीन वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त होतो. त्यानंतर जेव्हा दिल्लीला पोहोचलो तेव्हा माझ्या मोबाइलचा मॅसेज बॉक्स चेक केला होता तेव्हा मला धक्काच बसला. माझ्या खात्यातून 2 लाख रूपये काढले असल्याचा मॅसेज पाहिला. जे मी काढलेच नव्हते. मी दिल्लीत असताना मुंबईतून हे पैसे काढले होते.' माझ्यासोबत हा प्रकार घडला उद्या मी पैसे परत कमावूनही घेईल. माझ्याजागी जर एखादा गरीब माणूस असता आणि त्याने मेहनतीने पैसे खात्यात जमा केले असते तर त्याचं मोठं नुकसान झालं असतं, अशी भावनाही व्यक्त केली. त्यानंतर मुंबईत पोहोचल्यानंतर आनंद बलराज याने ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. आनंद बलराज यांच्या खात्यातून पैसे कुणी आणि कसे काढले, त्यांना कुणी फोन केला होता, याचा तपास पोलीस करत आहे.

ऑनलाईन बँकिंग, एटीएम क्लोनच्या माध्यमातून सर्रास पैसे काढण्याचे गुन्हे घडत आहे. आत्तापर्यंत डझनभर सिने अभिनेत्यांच्या खात्यातून परस्पर ऑनलाईन पैसे काढल्याचा प्रकार घडला आहे.

पेट्रोल पंपावर कार्डने पेमेंट करताना डेटा चोरून चोरी

दरम्यान, मागील आठवड्यात पेट्रोल पंपावर कार्डने पेमेंट करत असताना तुमच्या कार्डची माहिती चोरून फसवणूक करणारी टोळी मुंबई पोलिसांनी जेरबंद केली होती. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं एका टोळीचा पर्दाफाश केला. पेट्रोल पंपावर क्रेडिट किंवा डेबिट कार्डने बिल भरणाऱ्यांच्या कार्डमधील डेटा स्किमरच्या माध्यमातून चोरी करुन नंतर संबंधित खात्यातून पैसे काढून घेत होते. मुलुंडमध्ये राहणाऱ्या एका तक्रारदारासोबत असा प्रसंग घडला. त्यांच्या खात्यातून रक्कम काढून शून्य करण्यात आली. सदर प्रकरण गुन्हे शाखेकडे गेल्यावर त्यांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा असे प्रकार 16 ते 17 जणांसोबत घडले असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत पेट्रोल पंपावरच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत रितेश अग्रवाल, हैदर शेख, राजेश गौडा आणि उमेश लोकारे या तरुणांना अटक केली.

अशी करत होते कार्डची डेटा चोरी!

या संपूर्ण प्रकरणाचा रितेश अग्रवाल हा मास्टरमाईंड होता. आरोपी राजेश गौडा हा एका पेट्रोल पंपावर काम करत होता. रितेश अग्रवाल याने राजेशला कमिशन देण्याचं आमिष दाखवून कुणी जर पेट्रोल पंपावर कार्डने पेमेंट करत असेल तेव्हा डेटा चोरी करुन घेण्यासाठी तयार केलं. यासाठी रितेशनं राजेशला एक स्किमर मशीन दिली. पेट्रोल पंपावर जेव्हा कुणी डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करायचा तेव्हा गौडा हा कार्डवर असलेला चार डिजीटल कोड बघून घेत होता आणि नंतर लपून स्किमर मशीनच्या माध्यमातून कार्डचा सर्व डेटा ट्रांसफर करून घेत होता. नंतर रितेश अग्रवाल हा स्किमर केलेल्या कार्डच्या माध्यमातून आपला लॅपटॉप वापरून संबंधित खात्यातली सर्व रक्कम काढून घेत होता.

First published: