मुंबई, 04 फेब्रुवारी : अंमली विरोधी पथक NCB च्या अधिकाऱ्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची (Underworld don Dawood Ibrahim) ड्रग्सची फॅक्ट्री उद्ध्वस्त केली. पण या छोटा दाऊदचा मेंदू म्हणजे मास्टरमाईंड कोणी वेगळाच होता. त्याचे नाव आहे मोहम्मद हुसैन बिलाल उर्फ तेलवाला (Mohammad Hussain Bilal Tilewala). हा तोच तेलवाला आहे जो आरीफशी श्वेता नावाने चॅटिंग करायचा ते ही कोड लॅंगवेज म्हणजे सांकेतिक भाषेत, कोण आहे हा मोहम्मद हुसैन बिलाल उर्फ तेलवाला?
NCB ला आरीफच्या चौकशीत काही चॅटिंग सापडले होते. त्यात आरीफ श्वेता नावाच्या एका मुलीशी चॅटिग करत होता. पण आरीफशी चॅटिंग करणारी ही श्वेता कोण? यासाठी NCB ने त्यांचे सर्व रेकाॅर्ड तपासले. सर्व खबऱ्यांना हलवले, एकूण एक सुत्रे हलवली पण ही श्वेता कोण आहे? हे काय NCB ला कळत नव्हते पण एक दिवस चमत्कार झाला. विविध महिला अशा प्रकारे चॅटिंग करत असल्याची माहिती NCB ला मिळाली ज्यात एन्गेजमेंट हा शब्द काॅमन होता आणि चॅटिंगचा क्रमही सारखाच होता. तेव्हा NCB ने अधिक जोर लावला असता आरीफशी चॅटिंग करणारी श्वेता नावाची मुलगी ही मुलगी नसून एक पुरुष आहे जो आरीफला मदत करुन दाऊदला हजारो कोटी रुपयांचे ड्रग्स देत होता.
त्याचे नाव आहे “मोहम्मद हुसैन बिलाल उर्फ तेलवाला” बरोबर 10 वर्षां आधी जानेवारी 2011 या साली मोहम्मद हुसैन बिलाल उर्फ तेलवाला याला मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती.
हुसैनने भारतीय पोस्ट विभागातील कर्मचाऱ्यांना हाताशी घरुन त्यांच्या मार्फत तो परदेशातून आलेल्या अंमली पदार्थांची डिलेव्हरी करायचा. त्यावेळेस या हुसैनने तब्बल 1 हजार कोटी केटामाईन अंमली पदार्थ विकल्याचे तपासात उघड झाले होते. हाच मोहम्मद हुसैन बिलाल उर्फ तेलवाला त्यानंतर जामिनावर बाहेर आला तो आजही त्याने ड्रग्सचा काळा धंदा सुरुच ठेवला होता. एकदा अटक झाल्यानंतर हुसैन जास्तच एक्टिव्ह झाला होता. त्याने राज्यात मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि रायगड सारख्या भागात ड्रग्सच्या फॅक्ट्री चालवायचा.
7 लाखात घरं केलं खरेदी; आणि घरात सापडला 2 कोटींचा खजिना, VIDEO मध्ये पाहा घटना
पण कैलास राजपूत भारता बाहेर फरार झाला आणि हे दोघे झाले ड्रग्स किंग. हुसैन हा स्वत:च एक ड्रग फॅक्ट्री आहे. तो दर महिन्याला एका सेशनमध्ये म्हणजे 15 दिवसात किमान 100 किलो म्हणजे 100 कोटी रुपयांचे MD हे ड्रग्स बनवायचा. पण तो 2011 नंतर तो कधीच कोणाच्या रडारवर आला नाही.
स्वत:च्या फोनवरुन कधीच बोलत नव्हता. तो रोज नवीन फोन वापरायचा. या करता तो प्रत्येक नवीन सिम कार्डसाठी बनावट आधारकार्ड बनवायचा. हुसैनची सर्व आधारकार्ड वेगवेगळ्या मुलींच्या नावाने असायची. कधी श्वेता, कधी आसीफा, कधी दिलजान, कधी हसिना तर कधी श्वेता अशी विविध नावे वापरुन हुसैन चॅटिंग करायचा.
कृष्णाच्या नगरीत लागलं गाय आणि बैलाचं लग्न, वाजत-गाजत निघालं वऱ्हाड
आरीफच्या तपासातून मोहम्मद हुसैन बिलाल उर्फ तेलवालाचे नाव समोर येताच त्याला पकडण्यासाठी NCB ने हुसैनच्या घरावर जोगेश्वरी येथे धाड टाकली. मात्र चिंकूच्या अटकेनंतर हुसैन देखील सतर्क झाला होता. त्यामुळे तो फरार झाला होता. पण हा हुसैन इतका नीच निघाला की, त्याने आपल्या अल्पवयीन मुलाला आणि गंभीर आजार असलेल्या एका मुलीला तसच घरात सोडून पत्नी आणि मोठ्या मुलासह फरार झाला. तो कितीही लांब पळाला तरी एनसीबी त्याच्या मुसक्या आवळल्या शिवाय राहणारी नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.