Home /News /crime /

सोलापुरात मॉब लिंचिंग, शेळीचोर समजून गावकऱ्यांची तरुणाला झाडाला बांधून मरेपर्यंत मारहाण

सोलापुरात मॉब लिंचिंग, शेळीचोर समजून गावकऱ्यांची तरुणाला झाडाला बांधून मरेपर्यंत मारहाण

या गावात गेल्या काही दिवसांपासून शेळी चोराची अफवा पसरली होती. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये राग होता. हा तरुण त्यात सापडला आणि त्याचा बळी गेला.

    सोलापूर 01 ऑक्टोबर: सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुंभारी येथे गावकऱ्यांनी एका अज्ञात तरुणाला चोर समजून केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झालाय. शेळ्या चोरणारी टोळी आलीय अशी अफवा उठली असताना रात्रीच्या अंधारात हा अज्ञात तरुण गावातल्या काही लोकांना आढळला होता. गावातील या लोकांनी शेळीचोर समजून त्या तरुणाला झाडाला उलटा टांगून बेदम मारलं. त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. गावातील इतर लोकांनी वळसंग पोलीस ठाण्यात सदर प्रकरणाची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी झाडावरील मृतदेह उतरवून हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्या तरुणाला मृत घोषित केले. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली केली असून आणखी काही लोकांचा यात सहभाग आहे का याचा तपास सुरू केला आहे. या गावात गेल्या काही दिवसांपासून शेळी चोराची अफवा पसरली होती. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये राग होता. हा तरुण त्यात सापडला आणि त्याचा बळी गेला.  या घटनेबद्दल प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. देशात गो रक्षकांनी केलेल्या मारहाणीत अनेक तरुणांचे बळी गेले होते. त्यावरून देशभर प्रचंड वादळी निर्माण झालं होतं. कोरोना चाचणीचा रिपोर्ट येताच रुग्णाने केली आत्महत्या, नदीपात्रात घेतली उडी आंतरराष्ट्रीय स्तरावही अशा प्रकारच्या घटनांची चर्चा झाली होती. मात्र ग्रामीण भागात अजुनही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हा सामाजिक आणि राजकीय प्रश्न असून सामाजिक नेते म्हणवणाऱ्या लोकांनी समाजाची मानसिकता घडवायची असते असं मत व्यक्त केलं जात आहे. शिवसेना-राष्ट्रवादी पुरस्कृत आमदाराची 'दबंगगिरी', थेट मंदिरात केला प्रवेश पोलीस आता घटनेचा तपास करत असून तो युवक कोण होता याचाही तपास पोलीस करत आहेत. मात्र काही वाद असला तरी एखाद्याचा जीव घेतला जाऊ शकत नाही असंही सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. लोकांची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत परिस्थितीत बदल होणार नाही. त्यामुळे लोकांचं मत बदलणे आवश्यक असल्याचंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या