मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /तरुणीची छेड काढणं पडलं महागात, मार खाऊन काढाव्या लागल्या उठाबशा; तरुणीचा रुद्रावतार

तरुणीची छेड काढणं पडलं महागात, मार खाऊन काढाव्या लागल्या उठाबशा; तरुणीचा रुद्रावतार

तरुणीची छेड काढून पळून जाणाऱ्या एका (Mob beats a man who teased a young girl on road in Jharkhand) तरुणाला चांगलीच अद्दल घडल्याची घटना समोर आली आहे.

तरुणीची छेड काढून पळून जाणाऱ्या एका (Mob beats a man who teased a young girl on road in Jharkhand) तरुणाला चांगलीच अद्दल घडल्याची घटना समोर आली आहे.

तरुणीची छेड काढून पळून जाणाऱ्या एका (Mob beats a man who teased a young girl on road in Jharkhand) तरुणाला चांगलीच अद्दल घडल्याची घटना समोर आली आहे.

रांची, 29 सप्टेंबर : तरुणीची छेड काढून पळून जाणाऱ्या एका (Mob beats a man who teased a young girl on road in Jharkhand) तरुणाला चांगलीच अद्दल घडल्याची घटना समोर आली आहे. बाईकवरून आलेल्या तरुणाने तरुणीला (Man on bike teased lady) धक्का मारून छेड काढण्याचा प्रयत्न केला. ईव्हिनिंग वॉकसाठी चाललेल्या तरुणीला पाठिमागून धक्का मारून तो बाईकवरून निघून गेला. या प्रकाराने संतापलेल्या तरुणीने आरडाओरडा करत तरुणाचा पाठलाग सुरु केला. तरुणीला मदत करण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी मदत केली आणि तरुणाला पकडले.

अशी काढली छेड

झारखंडमधील धनबादमध्ये एक तरुणी रोजच्याप्रमाणे वॉक घेत होती. संध्याकाळच्या सुमाराला व्यायामासाठी बाहेर पडलेल्या तरुणीची बाईकवरून चाललेल्या एका तरुणाने छेड काढली. तरुणी रस्त्याने चालत असताना तो आपली बाईक तिच्याजवळ घेऊन आला आणि पाठिमागून तिला धक्का देत पुढे निघून गेला. या प्रकाराने तरुणीचा संताप झाला आणि तिने या तरुणाला चांगलीच अद्दल घडवायचे ठरवले.

तरुणाला घडवली अद्दल

तरुणाला जमावाने पकडल्यानंतर तो दारुच्या नशेत धुंद असल्याचं कळलं. सुरुवातीला आपण तरुणीची छेड काढल्याचं तो मान्यच करत नव्हता. अरेरावीनं बोलणाऱ्या या तरुणाला तरुणीनेही चांगलाच चोप दिला. जमावाचा आक्रमक अवतार बघून तरुण वरमला आणि तरुणाईला ‘ताई ताई’ म्हणायला त्याने सुरुवात केली.

हे वाचा - बापाने पोटच्या लेकीला आपटून आपटून केलं ठार, आईवडिलांच्या भांडणात लेकीचा बळी

तरुणीने दिली शिक्षा

तरुणी आणि जमावाने चोप दिल्यानंतर वरमलेल्या तरुणाला तरुणीने उठाबशा काढून जाहीर माफी मागायला लावली. तरुणाने माफी मागितल्यानंतरच जमावाचा राग शांत झाला आणि या तरुणाची सुटका झाली. तरुणीची सार्वजनिक ठिकाणी छेड काढणं त्याला चांगलंच महागात पडलं.

First published:
top videos

    Tags: Crime, Jharkhand