धुळे हादरलं, बेपत्ता असलेल्या 2 वर्षांच्या प्राचीचा विहिरीत आढळला मृतदेह

धुळे हादरलं, बेपत्ता असलेल्या 2 वर्षांच्या प्राचीचा विहिरीत आढळला मृतदेह

प्राची आणि तिचे कुटुंबीय घरात झोपले असताना दार उघडून कोणीतरी तिला उचलून नेल्याची चर्चा आहे.

  • Share this:

धुळे, 18 ऑक्टोबर : रावेरमध्ये 4 बहिण भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना धुळ्यात एका दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बेपत्ता असलेल्या या चिमुरडीचा विहिरीत मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी धुळे जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. निमगुळ या गावांमध्ये प्राची प्रवीण महाजन ही दोन वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. घरच्यांनी तिचा शोधाशोध केला, मात्र आज सकाळी तिचा मृतदेह निमगूळ शिवारातील एका विहिरीत तरंगतांना आढळला. दोन वर्षांच्या प्राचीचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली.

शरद पवारांची 'ती' सभा आणि उदयनराजेंसह भाजपचा पराभव

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन वर्षांच्या प्राचीचा विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

प्राचीचा मृतदेह हा शवविच्छेनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.  शवविच्छेदनात अधिक माहिती समोर येईल, असे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ, भाजप नगरसेवक पोहोचले शिवसेना नेत्यांच्या दरबारी

प्राची आणि तिचे कुटुंबीय  घरात झोपले असताना दार उघडून कोणीतरी तिला उचलून नेल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राचीचा मृत्यू हा घातपात आहे? की नरबळी देण्याचा प्रयत्न आहे याबाबत तपास सुरू आहे.

Published by: sachin Salve
First published: October 18, 2020, 1:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading