मीरा-भाईंदर, 30 ऑक्टोबर: मीरारोडच्या गीता नगरमध्ये दोघांवर तलावारीनं हल्ला करण्यात आला. दारुच्या नशेत काही लोकांनी परिसरातील लोकांवर तलवारीनं हल्ला केला. रिकाम्या बंगल्यात काही लोक मद्यपान करत होते. मद्यपान झाल्यानंतर त्यांनी महिलांशी छेडछाड केली. त्याचा जाब विचारल्यानं दारुड्यांनी सोमवारी रात्री दोघांवर हल्ला केला. हल्ल्याची सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.