Home /News /crime /

अल्पवयीन मुलानं केली वडिलांची गळा दाबून हत्या; कारण ऐकून सरकेल पायाखालची जमीन

अल्पवयीन मुलानं केली वडिलांची गळा दाबून हत्या; कारण ऐकून सरकेल पायाखालची जमीन

एका वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलाला गेम खेळण्यावरुन टोकलं. याचाच राग मनात धरून मुलानं आपल्या वडिलांची घरातच गळा दाबून हत्या (Minor Son Killed Father) केली.

    अहमदाबाद 03 सप्टेंबर : मोबाईल (Mobile) हा आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भागच बनला आहे. मात्र, याच मोबाईलमुळे कित्येकांचं आयुष्यही उद्धवस्त झालं आहे. एक असंच प्रकरण गुजरातच्या (Gujarat) सूरतमधून (Surat) समोर आलं आहे. यात एका वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलाला गेम खेळण्यावरुन टोकलं. याचाच राग मनात धरून मुलानं आपल्या वडिलांची घरातच गळा दाबून हत्या (Minor Son Killed Father) केली. ही घटना सूरत शहरातील इच्छापोरा ठाण्याच्या क्षेत्रात असलेल्या कवास गावात राहणाऱ्या अर्जून अरुण सरकार यांच्यासोबत घडली. अर्जून सरकार इथे आपली पत्नी आणि मुलासोबत राहात होते. मंगळवारी अर्जून सरकार यांना त्यांची पत्नी रुग्णालयात घेऊन गेली मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. एका अपघातातून बचावला पण दुसऱ्या अपघातात चिरडला; 11 वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत पत्नी डॉली आणि अल्पवयीन मुलगा अर्जून यांनी रुग्णालयात डॉक्टरांना असं सांगितलं, की अर्जून आठ महिन्याआधी बाथरुममध्ये पडले होते, तेव्हा त्यांना दुखापत झाली होती. मंगळवारी ते झोपले आणि पुन्हा उठलेच नाही. मृत अर्जून सरकार यांची पत्नी डॉली आणि अल्पवयीन मुलाच्या बोलण्यावर संशय आल्यानं डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. शवविच्छेदन अहवालात हे समोर आलं, की अर्जूनचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला आहे. या प्रकरणाची माहिती इच्छापोर पोलिसांनी दिली गेली. यानंतर चौकशीदरम्यान 17 वर्षीय मुलानं पोलिसांना सांगितलं की तो दिवसभर मोबाईलवर गेम खेळत असे, यामुळे त्याचे वडील सतत त्याला ओरडायचे. याच कारणामुळे मंगळवारी वडील झोपेत असतानाच त्यानं गळा दाबून त्यांची हत्या केली. बेपत्ता असणाऱ्या दीर-भावजयीचा हृदयद्रावक शेवट; धक्कादायक घटनेनं यवतमाळ हादरलं पोलिसांनी सध्या मृत अर्जून सरकार यांची पत्नी डॉली आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. मोबाईलमध्ये गेम खेळण्यावरुन ओरडल्यानं मुलानं उचलेल्या या धक्कादायक पाऊलामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Father, Murder news

    पुढील बातम्या