Home /News /crime /

नवी मुंबई: पोलिसावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणारी तरुणी बेपत्ता, सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक सत्य

नवी मुंबई: पोलिसावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणारी तरुणी बेपत्ता, सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक सत्य

आपण आत्महत्या करीत असून शोधण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या आत्महत्येस विनयभंग करणारा DIG निशिंकात मोरे जबाबदार असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे.

नवी मुंबई, 07 जानेवारी : खारघरमध्ये वास्तव्यास असलेले आणि पुणे येथे मोटर ट्रान्सपोर्ट विभागात कार्यरत असलेले पोलीस उप महानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेली अल्पवयीन मुलगी सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झाली आहे. तळोजा येथील घरातून सर्व झोपल्यानंतर रात्री 11-12च्या दरम्यान ती निघून गेली. जाताना तिने घरात सुसाईड नोट लिहल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आपण आत्महत्या करीत असून शोधण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या आत्महत्येस विनयभंग करणारा DIG निशिंकात मोरे जबाबदार असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे. यासंपूर्ण प्रकरणामध्ये तळोजा पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार दाखल करण्यात आली असून मुलीचा अद्याप पत्ता लागलेला नाही. एका व्हिडीओवरून निशिकांत मोरेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढदिवस साजरा करताना विनयभंग केल्याचं अप्लवयीन तरुणीने तक्रारीत म्हटलं होतं. 5 जुन रोजीचा हा प्रकार झाला होता. पण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने मुलीचे कुटूंब तणावात होते. अखेर 26 जुलै रोजी तळोजा पोलीस ठाण्यात मोरे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला गेला. त्यानंतर आज 3 वाजता त्याच्या जामीनावर सुनावणी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इतर बातम्या - आज करणार दिग्गज खेळाडूचा कमबॅक, अशी असेल भारताची प्लेयिंग इलेव्हन खरंतर, महिलांवरच्या अत्याचारांच्या घटनांनी देशभर असंतोष निर्माण झाला आहे. पोलिसांचा धाक उरलेला नाही अशीही टीका होतेय. अडचणीत सापडलेल्या महिलांना मदत मिळावी म्हणून अनेक विभागात पोलिसांनी विविध उपाय योजनाही सुरू केल्या आहेत. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी म्हणून पोलिसांनीही अनेक उपक्रम सुरू केलेत. पोलिसांनी महिलांची सुरक्षा केली पाहिजे अशी अपेक्षा असताना असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उपमहानिरीक्षक पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याविरुद्धच विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली. यामुळे खळबळ उडाली असून पोलिसांनीच असं कृत्य केलं तर सामान्य नागरिकांनी जायचं कुठे असा प्रश्न विचारला जातोय. दरम्यान, या सगळ्या घटनेवर पोलीस आणि कुटुंबीय पीडित तरुणीचा शोध घेत असून तिचा अद्याप पत्ता लागू शकलेला नाही. सुसाईड नोटवरून कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांचं पथक मुलीचा शोध घेत आहे. मुलीला शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येणार असून कुटुंबियांची चौकशी करण्यात येणार आहे. इतर बातम्या - पत्नीला म्हणाला, 5 मिनिटात घरी येईन; सकाळी पतीचा आढळला मृतदेह
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Navi Mumabi

पुढील बातम्या