रांची, 07 मार्च : घरासमोर बसलेल्या एका अल्पवयीन मुलीवर (Attack on Minor Girl) कारमधून आलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याचं (Gun Firing) धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. या जीवघेण्या हल्ल्यात पीडित मुलीला दोन गोळ्या लागल्या आहेत. गोळ्यांच्या आवाजाने परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी मुलीला (Badly Injured) त्वरित रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना झारखंडची राजधानी रांची येथील आहे. येथील गुन्हेगार इतके मोकाट सुटले आहेत की, त्यांनी दिवसा ढवळ्या एका मुलीवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात संबंधित मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. 14 वर्षीय रुचीच्या पायाला आणि हाताला गोळी लागली आहे. ही घटना रांचीच्या पंडरा ओपी परिसरात घडली आहे.पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडरा ओपी येथे कारमधून आलेल्या तीन हल्लेखोरांनी रुची कुमारी नावाच्या एका अल्पवयीन मुलीवर गोळ्या झाडल्या आहेत. या गोळीबारात रुचीला दोन गोळ्या लागल्या आहेत. काही कळायच्या आत हा हल्ला झाल्याने रुची स्वतःचा बचावही करू शकली नाही. गोळ्या लागल्यानंतर ती थेट जमिनीवर कोसळली. दरम्यान गोळ्यांच्या आवाजाने परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. इतक्यात हल्लेखोर कारमध्ये बसून वेगात फरार झाले आहे.
हे ही वाचा-पाकमध्ये हिंदू कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या; चाकू आणि कुऱ्हाडीनं गळा चिरला
जखमी रुचीनं सांगितले की, ती घराच्या बाहेर बसली होती, तेव्हा कारमधून तीन हल्लेखोर तिथे आले आणि त्यांनी तिच्यावर गोळीबार सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रुची कुमारीचे मामा विकास सिंह यांना गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून त्यांची तुरूंगात रवानगी केली आहे. त्यामुळे या गांजा कनेक्शनच्या वादातूनच हा हल्ला झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळं पंडारा परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Gun firing, Jharkhand, Ranchi