Home /News /crime /

अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार; अखेर 6 महिन्यांनी नराधमाला झाली अटक

अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार; अखेर 6 महिन्यांनी नराधमाला झाली अटक

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

कुटुंबातील लोकांना ठार मारण्याची धमकी दिल्यानं मुलीनं याबाबत कोणास काही सांगितले नव्हते. त्यामुळं या आरोपी नराधमानं सहा महिन्याचा काळात धमकी देत मुलीवर तीन वेळा बलात्कार (Rape) केला.

    बिलासपूर, 12 सप्टेंबर : घरात कोणी नसल्याचा फायदा घेत एका तरुणानं अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून तिच्यावर बलात्कार (minor girl raped) केल्याची घटना उघडकीस आली आहे. बलात्कार केल्यानंतर मुलीला मारहाण करण्यात आली. याबाबत कोणाला काही सांगितल्यास कुटुंबातील सर्वांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. जवळपास सहा महिन्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. कुटुंबातील लोकांना ठार मारण्याची धमकी दिल्यानं मुलीनं याबाबत कोणास काही सांगितले नव्हते. त्यामुळं या आरोपी नराधमानं सहा महिन्याचा काळात धमकी देत मुलीवर तीन वेळा बलात्कार (Rape) केला. मिळालेल्या माहितीनुसार, बिलासपूर महिला पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये पीडित मुलीनं सांगितले की, तिचे आई-वडील काही महिन्यांपूर्वी घरी नसताना आरोपी तरुण घरात आला आणि तिला धमकी देऊन बळजबरी केली. या दरम्यान त्याने तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवले आणि तिला कोणाशीही याबाबत न बोलण्यास सांगितले. या घटनेबद्दल कोणाला सांगितल्यास भाऊ, वडील आणि बहिणीला ठार मारण्याची धमकी दिली. हे वाचा - नवा फोन घेताय? 8 हजारहून कमी किमतीत मिळतोय 48MP कॅमेरा असणारा जबरदस्त स्मार्टफोन तीन वेळा बलात्कार केला तक्रारीमध्ये अल्पवयीन मुलीने आरोप केला आहे की, घटनेनंतरही तीन वेळा आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध IPC कलम 376 आणि POCSO कायदा आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. डीएसपी राजकुमार यांनी या घटनेबाबत दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Rape, Rape on minor

    पुढील बातम्या