बुलढाणा, १८ मार्च : शेगाव इथे पन्नास वर्षीय व्यक्तीने १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडलीय. गुंगीचे औषध देऊन आरोपीने हे कृत्य केले. या प्रकरणी मुलीने शेगाव पोलिसात तक्रार केली असून आरोपीविरुद्ध बलात्कार, पोस्को कायदा आणि एट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी गणेश शेजाळे याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पोलीस स्टेशन च्या अंतर्गत बलात्कारचा गुन्हा दाखल झाला. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन 50 वर्षीय नराधमाने बलात्कार केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गणेश शेजाळे विरुद्ध बलात्कार सह पोस्को कायदा अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news