रूपेश कुमार भगत (गुमला), 26 मार्च : झारखंडमधील गुमला येथील चैनपूर येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. चैनपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून तीनही आरोपींना पकडून कारागृहात पाठवले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चैनपूर येथील रहिवाशी अमरुद्दीन खान, मेहबूब खान आणि जामगई येथील शेख अस्लम यांचा समावेश आहे.
प्रत्यक्षात तिन्ही आरपींनी एका स्कॉर्पिओ गाडीतून अल्पवयीन मुलीचे गावातून अपहरण केले होते. त्यानंतर तीला निर्जन स्थळी नेण्यात आले. दरम्यान त्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सततचा विरोध आणि आरडाओरडा यामुळे मुलीने तिला पुन्हा गाडीत बसवले आणि गावात आणले. दरम्यान, या अपहरणाची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी या वाहनाचा पाठलाग केला.
अनैतिक संबंध आणि तंत्र-मंत्राच्या नादात आईचे भान हरपले, दोन निष्पाप मुलांचा...
दरम्यान पिडीतेच्या नातेवाईकांना वाटेत समोरून एक स्कॉर्पिओ गाडी येताना दिसली. या वाहनात पिडीत मुलगी असल्याचे आढळले. त्यानंतर नातेवाईकांनी स्कॉर्पिओचा पाठलाग सुरू केला. हल्लेखोरांना लक्षात आले आपला पाठलाग कोण तरी करत आहे. हे समजताच हल्लेखोरांनी मुलीला चालत्या वाहनातून खाली फेकून दिले.
यावेळी नातेवाईकांनी त्या मुलीला उचलून घेत घरी आणले. दरम्यान त्या मुलीला घडलेल्या घटनेविषयी विचारण्यात आले. यानंतर नातेवाईकांनी पोलीस स्टेशन गाठत या विषयीची तक्रार देण्यात आली. पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवून कारवाईची मागणी करण्यात आली. चैनपूर येथील रहिवासी अमरुद्दीन खान, जामगई येथील रहिवासी मेहबूब खान आणि शेख अस्लम यांच्यावर या प्रकरणी आरोप करण्यात आले आहेत.
सोशल मीडिया, वेबसाईट्सवर नोकरी शोधताना सावधान! अशी होते आर्थिक फसवणूक
चैनपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी आशुतोष कुमार सिंह यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्काराचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्वांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Jharkhand, Local18