Home /News /crime /

जन्मदाताच ठरला प्रेमात अडसर, लेकीने प्रियकराच्या मदतीने बापाला संपवलं

जन्मदाताच ठरला प्रेमात अडसर, लेकीने प्रियकराच्या मदतीने बापाला संपवलं

एका अल्पवयीन मुलीनं (Minor girl) प्रियकराच्या मदतीनं (With help of Lover) आपल्या जन्मदात्या बापालाच (Father) संपवलं (Murder) आहे.

    कौशंबी, 05 जानोवारी: एका अल्पवयीन मुलीनं (Minor Girl) प्रेमात (Love) अडथळा ठरणाऱ्या आपल्या बापाची (father) हत्या (Murder) घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या प्रियकराच्या (Lover) मदतीनं तिनं आपल्या जन्मदात्या बापालाच संपवलं (Murder) आहे. त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रियकरानं मुलीच्या वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाडीनं (axe) वार करत गळा चिरून हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला आणि मुलीला अटक केली आहे. स्थानिक पोलीस या हत्येचा पुढील तपास करत आहेत. कौशांबी जिल्ह्यातील सराय अकिल परिसरात एका शेतकऱ्याची 5 दिवसांपूर्वी हत्या झाली होती. डोक्यात कुऱ्हाडीनं वार करुन त्यांची निर्दयी हत्या केली होती. या प्रकरणांत पोलीस तपास करत असताना, त्यांना मृत व्यक्तीच्या मुलीवर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मुलीची चौकशी केली. त्यानंतर हत्येचं हे प्रकरण उलगडलं. तबरेज अहमद नावाची मृत व्यक्ती आपल्या गावातचं शेती करायची. काही दिवसांपासून तो आपल्या घराची डागडुजी करत होता. त्यामुळं तो रात्री शेजारील कुट्टूच्या घरी झोपायला जात असे. घटनेच्या रात्रीही तरबेज शेजारील कुट्टूच्या घरी झोपायला गेला होता. त्यारात्री 12 वाजण्याच्या सुमारास अचानक एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्यावर कुऱ्हाडीनं वार केला. या हल्ल्यात तरबेजचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्याच रात्री घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. एक आठवडाभर तपास केल्यानंतर मृत व्यक्तीच्या अल्पवयीनं मुलीनंचं हत्या घडवून आणल्याचं पोलिसांनी उघड केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिल मुलीच्या प्रेमात अडथळा ठरत होते. हे आरोपी मुलीला आवडत नव्हतं. त्यामुळं तिने आपल्या प्रियकराला सांगून स्वतःच्या बापाच्या हत्येचा कट रचला आणि संधी मिळताच प्रियकरानं कुऱ्हाडीनं डोक्यात वार करुन तरबेज अहमद यांची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक करून तुरुगांत पाठवलं आहे. वरिष्ठ पोलीस अधिक्षक समर बहादूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रेहान मृत तबरेजच्या मुलीवर प्रेम करत होता. बारावीत शिकणाऱ्या या मुलीच्या प्रेम प्रकरणाची माहिती तबरेजला कळताच. त्यानं आपल्या मुलीची शाळा बंद केली आणि घरीच राहायला सांगितलं. तरीही हे दोघं एकमेकांशी लपून छपून गप्पा भेटत असत. ही घटना तरबेजला कळताच त्यानं आपल्या मुलीला बेदम मारहाण केली होती. त्यामुळं संतप्त मुलीनं आपल्या फोनवरून आपल्या प्रियकराला ही माहिती दिली आणि हत्येचा कट रचला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Murder

    पुढील बातम्या