संतापजन! अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या, रायगड हादरलं

संतापजन! अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या, रायगड हादरलं

या घटनेमध्ये संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तर नागरिकांमध्येही संतापाचं वातावरण आहे.

  • Share this:

रोहा, 27 जुलै : राज्यात कोरोनाच्या महामारीमुळे मोठं संकट ओढावलं आहे. अशात लॉकडाऊनमध्ये बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तांबडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमध्ये संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तर नागरिकांमध्येही संतापाचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 26 जुलै रात्री ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात रोहा पोलीस स्थानका गुन्हा दाखल केला आहे. तर असा निर्दयी प्रकार कोणी केला याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला आहे.

महाराष्ट्राच्या जवानाचा कोरोनाने मृत्यू, कुटुंबाने VIDEO कॉलवर घेतलं अंत्यदर्शन

दरम्यान, या घटनेमुळे रोहा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेची विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दखल घेतली असून उद्या मंगळवार 28 जुलै रोजी ते रोहाच्या दौ-यावर येत आहेत.

पिंपरीमध्ये 4 वर्षाच्या लेकीला आईने जमिनीवर आपटलं आणि चार्जरच्या वायरने....

विरोधी पक्ष नेते दरेकर उद्या सकाळी सा़डे आठ वाजता ज्या ठिकणी त्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी भेट देणार आहेत. त्यानंतर या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी संध्याकाळपासून ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. त्यामुळे कुटुंबीयांकडून तिचा शोध सुरु होता. अखेर रात्री उशीरा गावाबाहेर या मुलीचा मृतदेह सापडला.

पलंगावरून पडला कोरोना रुग्ण, पण हॉस्पिटलच्या दुर्लक्षामुळे घडला भयंकर प्रकार

यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.पोलिसांच्या अंदाजानुसार,रविवारी संध्याकाळी साधारण साडेसात ते आठच्या सुमारास तांबडी परिसरातील एका फार्महाऊसवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. यानंतर नराधमांनी तिचा खून करुन तिचा मृतदेह गावाच्या बाहेर टाकून पळ काढला.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 27, 2020, 6:50 PM IST

ताज्या बातम्या