Home /News /crime /

धक्कादायक! 17 वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन चार वेळा 50 हजारात विकले

धक्कादायक! 17 वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन चार वेळा 50 हजारात विकले

हरियाणाच्या (Haryana) भिवानीमध्ये वधुसाठी मुलगी खरेदी केल्याचे (Girl Selling in Bhiwani) प्रकरण समोर आले आहे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर एक निराधार 17 वर्षीय मुलीला दिल्लीतील एका महिलेने विकले.

  भिवानी, 13 मे : हरियाणाच्या (Haryana) भिवानीमध्ये वधु म्हणून मुलगी खरेदी केल्याचे (Girl Selling in Bhiwani) प्रकरण समोर आले आहे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर एका निराधार 17 वर्षीय मुलीला दिल्लीतील एका महिलेने विकले. भिवानी, खरखौदा आणि इतर ठिकाणी फक्त 40 ते 50 हजार रुपयांना विकले. तरुण मुलींच्या विक्रीप्रकरणी दिल्लीतील रहिवाशी महिलेला भिवानी येथील महिला ठाणे पोलिसांच्या एका पथकाने अटक केली आहे. नेमके प्रकरण काय? याप्रकरणी भिवानीचे पोलीस अधीक्षक (Bhiwant SP) अजित सिंह शेखावत यांनी सांगितले की, भिवानीच्या महिला ठाणे पोलिसांनी याप्रकरणी दिल्लीतील रहिवाशी रीना नावाच्या महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी महिलेला न्यायालयात हजर केले. तिला दोन दिवसांच्या पोलीस रिमांडवर घेण्यात आले आहे. याप्रकरणी तिची कसून चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. जानेवारी महिन्यातही अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन बळजबरीने त्यांचे लग्न लावून दिले जात होते. याप्रकरणी एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला होता. या टोळीतील सदस्य नाबालिक मुलींचे अपहरण करत होते. नंतर त्यांना हरयाणाच्या विविध जिल्ह्यात विकून टाकत होते. या टोळीत सहभागी असलेल्या महिलेसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हेही वाचा - मेहुण्याच्या मृतदेहाचे 31 तुकडे केले, म्हणून आरोपीला दिली थरकाप उडवणारी शिक्षा
  पोलीस चौकशीत झाला खुलासा - 
  पोलिसांनी चौकशी केली असता अनेक बाबींचा खुलासा झाला आहे. या टोळीने याप्रकारच्या अनेक घटना घडवून आणल्या आहेत. दोन आठवड्यांपूर्वी पूर्व ग्रेटर नोएडाच्या छपरौला येथून एका नाबालिक मुलगी गायब झाली होती. यानंतर बादलपूर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आणि मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. काही दिवसांनी पोलीस पथकाला मुलीच्या अपहणानंतर सोनीपत येथे तिचे लग्न केल्याचे पुरावे मिळाले. यानंतर घटनेचा खुलासा झाला.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime news, Haryana

  पुढील बातम्या