मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

...नाहीतर तुझ्या पोरीला पळवून नेऊ; बीडमध्ये तरुणांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

...नाहीतर तुझ्या पोरीला पळवून नेऊ; बीडमध्ये तरुणांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं सोमवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. (File Photo)

अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं सोमवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. (File Photo)

Suicide in Beed: तरुणांच्या सततच्या त्रासाला कंटाळून बीडमध्ये (Beed) एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या (Minor girl suicide) केली आहे. आरोपी पीडितेच्या घरी जाऊन सातत्यानं तिला उचलून नेण्याची धमकी (sexual harassment) देत होते.

  बीड, 31 मे: तरुणांच्या सततच्या त्रासाला कंटाळून बीडमध्ये (Beed) एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या (Minor girl suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुण गेल्या काही दिवसांपासून पीडितेच्या घरी येऊन सातत्यानं तिला उचलून नेण्याची धमकी आणि शिवीगाळ (abuse and sexual harassment) करत होते. त्यामुळे पीडित मुलीने शनिवारी सकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 3 जणांविरुद्ध गुन्हा (FIR lodged) दाखल केला आहे. तिन्ही आरोपी सध्या फरार असून गेवराई पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. संबंधित घटना बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील जयरामनाईक तांडा याठिकाणी घडली आहे. येथील अरुण बाबासाहेब चव्हाण हा तरुण गेल्या एका वर्षापासून पीडित मुलीचा पाठलाग करत होता. तो नेहमीच पीडितेच्या घरासमोरून चकरा मारत असायचा. 'मला तू फार आवडतेस, मला तुझ्यासोबतचं लग्न करायचं आहे, असं म्हणत आरोपी सतत तिला त्रास द्यायचा. एवढंच नव्हे तर आरोपी अरुणचे वडील आणि त्याचा भाऊ किरण यांनीही पीडितेच्या घरी जाऊन तिच्या वडिलांना धमकी दिली होती. 'तुमच्या मुलीचं आमच्या अरुणसोबत लग्न लावून द्या, नाहीतर तिला आम्ही पळवून नेऊ आणि तुम्हाला जीवे मारू' अशी धमकीही आरोपींनी पीडितेच्या वडिलांना अनेकदा दिली होती. दरम्यान आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने 29 मे रोजी संध्याकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हे ही वाचा-जुन्या वादातून तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या, मुंबईतील घटनेचा VIDEO पुढारीने दिलेल्या वृत्तानुसार, मृत मुलीच्या वडिलांनी गेवराई पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. अरुण बाबासाहेब चव्हाण, बाबासाहेब देवू चव्हाण, किरण बाबासाहेब चव्हाण अशी आरोपींची नावं आहेत. वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगासोबत आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिन्ही आरोपी सध्या फरार असून गेवराई पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Beed, Crime news, Sexual harassment, Suicide

  पुढील बातम्या