Home /News /crime /

हिंगोली हादरलं! उंदीर मारण्याचं औषध खाऊन अल्पवयीन मुलीची आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

हिंगोली हादरलं! उंदीर मारण्याचं औषध खाऊन अल्पवयीन मुलीची आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात उटी ब्रह्मचारी नावाचे गाव आहे. या गावातील अजय समाधान इंगोले आणि शिवाजी पांढरे हे दोनही जण ऋतुजा हिला त्रास देत होते. या दोघांच्या त्रासाला ऋतुजा कंटाळली होती.

    हिंगोली, 28 मे : दिवसेंदिवस आत्महत्येच्या (Suicide) घटनांमध्ये वाढ होत आहे. कुणी अनैतिक संबंधातून (Immoral Relation), तर कुणाच्या जाचाला कंटाळून तर कुणी नैराश्यातून आत्महत्या (Suicide in Depression) करत आहे. यातच आता आणखी हिंगोली जिल्ह्यातून एक छक्कादायक घटना समोर आली आहे. उंदीर मारण्याचे औषध खाल्ले -  सेनगाव तालुक्यातील उटी ब्रह्मचारी येथे एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या (Minor Girl Sucide) केली आहे. ऋतुजा ज्ञानेश्वर साळवे (रा. उटी, बह्मचारी), असे मृत मुलीचे नाव आहे. तिचे वय 15 इतके होते. तिने छेडछाडीच्या प्रकाराला कंटाळून उंदीर मारण्याचे औषध खाल्ले होते. (Suicide Attempt in Molestation) घरच्यांचा लक्षात हा प्रकार आल्यावर लगेचच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, तिचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. उपचारादरम्यान मृत्यू - हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात उटी ब्रह्मचारी नावाचे गाव आहे. या गावातील अजय समाधान इंगोले आणि शिवाजी पांढरे हे दोनही जण ऋतुजा हिला त्रास देत होते. या दोघांच्या त्रासाला ऋतुजा कंटाळली होती. यातूनच तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिने 25 मेला सकाळी उंदीर मारण्याचे औषध खाल्ले. घरच्यांचा लक्षात हा प्रकार आल्यावर लगेचच तिला सुरुवातीला सेनगाव येथील रूग्णालयात व त्यानंतर औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान, 26 मेला गुरुवारी तिचा मृत्यू झाला. हेही वाचा - Attack on wife : जेवणात चिकन बनवलं नाही; ठाण्यात पतीकडून पत्नीवर जीवघेणा हल्ला याप्रकरणी पीडित मुलीचे वडिलांनी फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजय समाधान इंगोले व शिवाजी पांढरे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच पोक्सो ॲक्टनुसार सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra News, Suicide

    पुढील बातम्या