मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

15 इंच जमिनीचा वाद पुतणीच्या जीवाशी; सख्ख्या काकूने रॉकेल ओतून..

15 इंच जमिनीचा वाद पुतणीच्या जीवाशी; सख्ख्या काकूने रॉकेल ओतून..

15 इंच जमिनीचा वाद पुतणीच्या जीवाशी

15 इंच जमिनीचा वाद पुतणीच्या जीवाशी

Bihar Crime News: सख्ख्या चुलतीने पुतणीला जिंवत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

समस्तीपूर, 28 नोव्हेंबर : केवळ 15 इंच जमिनीचा वाद विकोपाला गेल्यानंतर सख्ख्या काकूनं तिच्या पुतणीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळलं. समस्तीपूर जिल्ह्यातील रोसडा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात उदयपूरमध्ये ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. जमिनीचा वाद ग्रामपंचायतीपर्यंत गेला होता. तिथं यावर चर्चा झाल्यानंतर मुलीचे वडिल सिंघेश्वर राम हे कामासाठी निघून गेले. त्यानंतर 14 वर्षांची नेहा कुमारी ही एकटी घरी असताना काकूनं निर्दयीपणे तिला जिवंत जाळलं.

मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तिला कुटुंबीयांनी तत्काळ रोसडा येथील उपविभागीय रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु, तिथं बर्न वॉर्डची सुविधा नसल्यानं व तिची प्रकृती गंभीर असल्या कारणानं उपचारांसाठी तिला डीएमसीएचमध्ये रेफर केलं गेलं. या रुग्णालयातील डॉ. पी.डी. शर्मा म्हणाले की, जखमी नेहाची प्रकृती गंभीर आहे. ती 80 ते 90 टक्क्यांपर्यंत भाजली आहे. या संदर्भात बोलताना नेहाचे वडील म्हणाले की, मागील 10 वर्षांपासून माझा मोठ्या भावाशी जमिनीचा वाद सुरू होता. त्यामुळे वडिलांच्या हिश्शाची जमीन त्याला दिली होती. फक्त 10 ते 15 इंच जमिनीचा वाद सुरू होता. याच कारणामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांनी रोसडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. समस्तीपूर सदर रुग्णालयात ड्युटीवर असलेले एसआय विनयकुमार म्हणाले की, या प्रकरणात जमिनीचा वाद सुरू आहे. जबाब नोंदवल्यानंतर याबाबतची अधिक कारवाई केली जाईल.

वाचा - सुनेवर ठेवली वाईट नजर, मुलाने केला वार.. नवऱ्याचे 22 तुकडे केल्याचे आरोपी महिलेची कबुली

ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचला होता वाद

वडिलोपार्जित जमिनीवरून कुटुंबातील दोन भावांमध्ये भांडण होतं. सतत वाद होत असल्याने सिंघेश्वर यांनी त्यांच्या वडिलांच्या हिश्श्याची जमीन मोठ्या भावाला दिली होती. पण जमिनीच्या वाटणीवरून पुन्हा वाद निर्माण होत होता. केवळ 10 ते 15 इंच जमीन कोणाकडे असावी यासाठी या दोघांच्या कुटुंबीयांत वाद होत होता. दोघांचा वाद ग्रामपंचयतीपर्यंतही पोहोचला होता. यावर वेळोवेळी चर्चाही केली जायची. घटनेच्या दिवशी ग्रामपंचायतीत दोघांच्या जमिनीच्या वादावर चर्चा झाली होती. त्यानंतर दोघं आपापल्या घरी गेले. पण नेहाच्या काकूच्या मनात यावरून प्रचंड राग होता. सिंघेश्वर कामाला निघून गेल्यानंतर नेहाच्या काकूने नेहाच्या अंगावर रॉकेल टाकलं व जिवंत जाळलं. हा प्रकार घडल्यानंतर नेहा वेदनेनं ओरडत होती. शेजारी लोकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. ती 80 ते 90 टक्क्यांपर्यंत भाजली. कुटुंबीयांनी तिला तत्काळ रुग्णालयात नेलं; पण ती अधिक प्रमाणात भाजल्यानं सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

First published:

Tags: Bihar, Crime