मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

घृणास्पद! तिघांनी अल्पवयीन मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये व्हॅक्यूम क्लीनरनं भरली हवा, मृत्यू

घृणास्पद! तिघांनी अल्पवयीन मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये व्हॅक्यूम क्लीनरनं भरली हवा, मृत्यू

तिघांनी एका अल्पवयीन मुलाच्या प्रायवेट पार्टमध्ये व्हॅक्यूम क्लीनरनं (Vacuum Cleaner) हवा भरली. या घटनेत अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Kiran Pharate

वाराणसी 08 मार्च : उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. इथे तिघांनी एका अल्पवयीन मुलाच्या प्रायवेट पार्टमध्ये व्हॅक्यूम क्लीनरनं (Vacuum Cleaner) हवा भरली. या घटनेत अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलानं रुग्णालयात घेऊन जात असतानाच तिथे उपस्थित लोकांना आरोपींची नावं सांगितली. याच आधारावर तीन आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गुरुनानक राइस मिल (Gurunanak rice mill) इथलं आहे. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यानं आणि वडिलांची तब्येत बिघडली असल्यानं हा 14 वर्षांचा मुलगा याठिकाणी कामासाठी जात होता. याच राइस मिलमध्ये इतर चार तरुणही काम करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी जेवणाच्या वेळी दोन तरुणांनी चेष्टेत या अल्पवयीन मुलाला पकडलं आणि आपल्या दुसऱ्या एका मित्राच्या मदतीनं त्याच्या प्रायवेट पार्टमध्ये व्हॅक्यूम क्लीनरनं हवा भरली.

या घटनेनंतर अल्पवयीन मुलाची प्रकृती बिघडली. यानंतर तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, प्रकृती गंभीर असल्यानं त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. इथेच उपचारादरम्यान अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं, की हवेमुळे त्याच्या आतड्यांना इजा झाली. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं त्याला बरेलीमधील (Bareily) एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथेच उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाला.

First published:

Tags: Crime, Crime news, Dead body, Murder, Murder news, PRIVATE part, Shocking news, Uttar pradesh