माणुसकीला काळीमा! पैशाच्या वादातून घरमालकाने केला चिमुकलीवर बलात्कार

पैशांच्या वादावरुन घरमालकानं चिमुकलीवर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियानी केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2019 12:30 PM IST

माणुसकीला काळीमा! पैशाच्या वादातून घरमालकाने केला चिमुकलीवर बलात्कार

बदायूं, 05 सप्टेंबर: उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातील धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पैशांच्या वादावरुन घरमालकानं चिमुकलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. बलात्काराचा आरोप असलेला व्यक्ती वयस्कर आणि घरमालक असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरमालक आणि पीडितेच्या कुटुंबियांमध्ये पैशांवरून वाद झाले होते. त्या वादाचा बदला घेण्यासाठी घरमालकानं हे कृत्य केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे.

या प्रकरणी स्थानिक पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आहे. पीडित मुलीच्या वैद्यकीय अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

मैलानाने बागपत इथे महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील बागपत इथे महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मौलानाने बलात्कार केल्याचा आरोप महिला कॉन्स्टेबलने केला आहे. या आरोपामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. उपचार करण्याच्या नावाखाली मौलानाने माझ्यावर 14 महिने बलात्कार केल्य़ाचं पीडित महिलेचं म्हणणं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मौलानाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

पीडितेचा मुलगा अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर डॉक्टरांचे उपचार करूनही काहीच सुधारणा नव्हती. त्यासाठी पीडितेला एका व्यक्तीने मौलानाजवळ जाण्याचा सल्ला दिला. मौलानावर अंधविश्वास ठेवून पीडित महिला मुलाच्या उपचारासाठी गेली मात्र त्यानंतरही मुलाची तब्येत सुधारत नव्हती. मुलाच्या उपचाराच्या नावाखाली मौलाना पीडितेचं शोषण करत होता. पीडितेला शंका आल्यानंतर तीने तत्काळ पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

Loading...

प्रकाश मेहतांचे समर्थक चिडले, भाजप उमेदवाराच्या बॉडीगार्डला बेदम मारहाण, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2019 12:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...