मेक्सिको 02 जानेवारी : अमेरिकेतून गोळीबाराची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेक्सिकोच्या उत्तरेकडील शहर स्यूदाद जुआरेझ येथील कारागृहात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी रविवारी हल्ला केला. या हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्याचा फायदा घेत 24 कैदी कारागृहातून फरार झाले.
चिहुआहुआ स्टेट प्रॉसिक्यूटरच्या कार्यालयानं सांगितलं की हल्ल्यानंतर अज्ञात हल्लेखोर पळून गेले. त्यांनी सांगितलं की, मरण पावलेल्यांमध्ये 10 तुरुंग रक्षक आणि सुरक्षा एजंट आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. यानंतर कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाली.
थर्टी फस्टला नशेचा ओव्हरडोस, तब्बल 1 कोटींचं ड्रग्स जप्त, 16 नायजेरियन ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या काही वेळापूर्वी बुलेव्हार्डजवळ सशस्त्र लोकांनी महापालिका पोलिसांवरही गोळीबार केला होता. त्यानंतर हल्लेखोरांनी तुरुंगाबाहेरील सुरक्षा दलाच्या सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. त्यानंतर हमरमधील हल्लेखोरांनी तुरुंगाबाहेरील सुरक्षा एजंटच्या दुसऱ्या गटावर गोळीबार केला. फिर्यादीने सांगितलं की हल्ल्यानंतर कारागृहातील कैद्यांमध्येही हाणामारी झाली. या मारामारीत 13 जण गंभीर जखमी झाले.
या हल्ल्यानंतर चार जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. मात्र, ताब्यात घेण्यात आलेले ते कैदी होते की शस्त्रधारी हे त्यांनी सांगितलं नाही. तसंच 24 कैदी कारागृहातून कसे पळाले हे अद्याप समजू शकलेलं नाही. एल पासोच्या सरकारी वकिलांनी सांगितलं की ते तुरुंगावरील हल्ल्याच्या हेतूचा तपास करत आहेत.
VIDEO पुण्यातील कोयता गँगचा केला 'करेक्ट कार्यक्रम'; पोलिसांनी सांगितला तो अनुभव
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, नववर्षानिमित्त काही कैद्यांचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी कॅम्पसबाहेर थांबले होते. इतक्यात गोळीबाराच्या घटनेनंतर कारागृह आणि आसपासच्या परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. तुरुंगात काही कैद्यांनी अनेक वस्तूंना आग लावली आणि कारागृहाच्या सुरक्षारक्षकांशी झटापट केली. याचाच फायदा घेत काही कैद्यांनी पळही काढला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Gun firing