बीड, 26 मार्च : ग्राहकाच्या त्रासाला कंटाळून एका किराणा दुकानदाराने आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. ही धक्कादायक घटना बीडच्या धारुर तालुक्यातील कान्नापूर येथे घडलीय. अविनाश आशोक देशमुख वय 32, रा. कान्नापूर ता. धारुर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या दुकानदार तरुणाचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अविनाश देशमुख यांचे कान्नापूर येथे दुकान आहे. गावातीलच स्वप्नील रामकिशन देशमुख, सुरज रामकिशन देशमुख, सुमित्रा रामकिशन देशमुख यांना अविनाशने किराणा साहित्य उधार दिले नव्हते. याचा राग आल्याने त्यांनी अविनाश देशमुख यांना सतत त्रास देण्यास सुरुवात केली. त्याचा वारंवार मानिसक छळ केला. या त्रासाला कंटाळून शेवटी अविनाशने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.
शेतात भेंडी तोडताना झाला वाद, सख्ख्या भावानेच घेतला भावाचा जीव
दरम्यान, याप्रकरणी मयताचे भाऊ संतोष देशमुख यांनी पोलिसात फिर्याद दाखल केलीय. फिर्यादीवरून बीडच्या सिरसाळा पोलीस ठाण्यात, स्वप्नील रामकिशन देशमुख, सूरज रामकिशन देशमुख, सुमित्रा रामकिशन देशमुख यांच्यावर कलम 306, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime