मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पुण्यातील ग्रामीण भागात ड्रग्स माफियाला अटक, 54 हजारांचा मुद्देमाल जप्त

पुण्यातील ग्रामीण भागात ड्रग्स माफियाला अटक, 54 हजारांचा मुद्देमाल जप्त

लोणीकाळभोर येथील कवडीपाट टोल नाका परिसरात एक इसम मेफेड्रोन ( Mephedrone  DRUGS) नावाचा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.

लोणीकाळभोर येथील कवडीपाट टोल नाका परिसरात एक इसम मेफेड्रोन ( Mephedrone DRUGS) नावाचा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.

लोणीकाळभोर येथील कवडीपाट टोल नाका परिसरात एक इसम मेफेड्रोन ( Mephedrone DRUGS) नावाचा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.

सुमित सोनावणे, प्रतिनिधी

लोणी काळभोर, 17 नोव्हेंबर : पुणे (Pune) जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कदम वस्तीच्या हद्दीत कवडीपाट टोल नाका परिसरात अंमली पदार्थ (Mephedrone) विक्री करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.  अटक करण्यात आला व्यक्तीकडून 6850 ग्रॅम ड्रग्स हस्तगत केले आहे.

पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहिती नुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुणे सोलापूर महामार्गावर गस्तीवर असताना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, लोणीकाळभोर येथील कवडीपाट टोल नाका परिसरात एक इसम मेफेड्रोन ( Mephedrone  DRUGS) नावाचा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे.

ऐन दिवाळीत रायगडावर शिवभक्ताचा मृत्यू, पायऱ्या चढत असतानाच ह्रदयविकाराचा झटका

त्यानंतर पोलिसांनी टोल नाक्यावर सापळा रचला आणि एका इसमाला ताब्यात घेतले.  त्याची अधीक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अशोक किट्टू पुजारी (वय 47,राहणार, कात्रज, पुणे) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिश्यात प्लास्टिकच्या पुडीमध्ये मेफेड्रोन (DRUGS) नावाचा अंमली पदार्थ सापडला. या ड्रग्सची किंमत 54,800 रुपये असल्याचे सांगण्यात आले.

मासे सापडतील म्हणून पाण्याची टाकी केली खाली, सापडली कवटी आणि हाडं,पुण्यातील घटना

मुद्देमालासह अशोक पुजारीला लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ट पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पो हवा राजेंद्र पुणेकर,विजय कांचन,धिरज जाधव,अक्षय नवले यांनी केली आहे.

First published:
top videos

    Tags: Pune crime