मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये घेतला गळफास; रात्री 3 वा. खोलीत गेली आणि...

मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये घेतला गळफास; रात्री 3 वा. खोलीत गेली आणि...

करिश्माच्या मृत्यूनंतर महाविद्यालयात खळबळ उडाली आहे.

करिश्माच्या मृत्यूनंतर महाविद्यालयात खळबळ उडाली आहे.

करिश्माच्या मृत्यूनंतर महाविद्यालयात खळबळ उडाली आहे.

  अलीगड, 15 ऑक्टोबर : अलीगडमधील होमियोपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये गुरुवारी रात्री उशिरा BHMS पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी करिश्मा हिचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू (Student Karishma dies in suspicious condition) झाला. कॉलेजमधील हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. याबाबत सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी विद्यार्थिनीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मृत विद्यार्थिनीचे वडील सब इन्स्पेक्टर आहे. कुटुंबीय कानपूरहून अलीगडला पोहोचले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाहून कोणतीही सुसाइट नोट सापडली नाही. तरीही या प्रकरणात तपास सुरू आहे. कानपूरमधील नोबस्ता निवासी करिश्मा यादव हिने (21) अलीगडच्या होमियोपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये यावर्षी अॅडमिशन घेतलं होतं. विद्यार्थिनीचे वडील उपदेश यादव सब इन्स्पेक्टर आहे आणि ते फतेदपूरमध्ये तैनात आहेत. विद्यार्थिनी मेडिकल कॉलेजमधील हॉस्टेलमध्ये राहत होती. सांगितलं जात आहे की, गुरुवारी रात्री उशिरा साधारण 3 वाजता ती आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेली. तब्बल एक तासानंतर दुसऱ्या खोलीतील विद्यार्थिनींना संशय आला की करिश्मा खोलीत पोहोचली नाही. त्यांनी दरवाज्याचं दार तोडून आत पाहिलं तर करिश्मा गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत होती. हे ही वाचा-नवऱ्याने आत्महत्या केली तर सासऱ्याने सुनेला दिला भयावह मृत्यू

  पोलीस घेतेय मुलीच्या कॉल डिटेल्सचा तपास... सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा मुलगी मोबाइलवर कोणाशी तरी बोलत होती. कोणत्या तरी गोष्टीवरुन नाराज होऊन विद्यार्थिनीने हे पाऊल उचलल्याचा संशय आहे. त्यामुळे तिच्या कॉल डिटेल्सचा शोध घेतला जात आहे. पोलीस हॉस्टेलच्या अन्य विद्यार्थिनींचीदेखील चौकशी करीत आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. सूचना मिळताच मृत विद्यार्थिनीचे कुटुंबीय कानपूरहून अलीगडकडे रवाना झाले आहेत. लवकरच आत्महत्येच्या कारणाचा खुलासा करण्यात येईल असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे.

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Crime, Medical, Suicide

  पुढील बातम्या