मुंबई, 25 मार्च : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा
(Mansukh Hiren Death case) तपास महाराष्ट्र एटीएसकडून
(ATS) राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए
(NIA) कडे देण्यात आला आहे. त्यामुळे दररोज नवनवीन खुलासे होत आहे. "मुझे इस झमेले मे मुझे मत लो!" या एका वाक्यामुळे मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचं तपासात समोर आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 फेब्रुवारीला दक्षिण मुंबईतील कार मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली हिरव्या रंगाची गाडी सापडल्यानंतर त्याबद्दल ज्या बातम्या येऊ लागल्या किंवा चर्चा होऊ लागली. त्यामुळे मनसुख अत्यंत अस्वस्थ झाला होता. एवढंच नाही तर मनसुखची पत्नी विमला मनसुख यांनी दिलेल्या जबाबानुसार, ज्यावेळेस स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे प्रकरण समोर आलं. त्यानंतर सचिन वाझे यांनीच 'या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी घेऊन स्वतःला अटक करून घे मी तुला बाहेर काढतो सर्व प्रकरण माझ्याकडेच आहे', असं मनसुख ला सांगितलं होतं.
पण या भानगडीत पडण्यास मनसुखने नकार दिल्याने सचिन वाझे आणि त्याच्या टीमचा मनसुख हिरेन यांच्यावरील विश्वास पूर्णपणे उडाला होता तसंच मनसुख हा आपल्याला अडचणीत आणू शकतो, यामुळे मनसुखची हत्या करण्यात आली आहे, असं महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होतं.
मनसुख हत्या प्रकरणाचा पूर्णपणे उलगडा झाला असून याबाबतची सविस्तर माहिती न्यूज 18 लोकमत च्या हाती लागली आहे. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चार मार्चच्या रात्री साधारणपणे 8 च्या सुमारास अटक आरोपी विनायक शिंदे यानेच मनसुख याला फोन करून आपण कांदिवली क्राइम ब्रांच मधून बोलत आहोत, आपले नाव तावडे असून हिरव्या रंगाच्या स्फोटकांनी भरलेल्या गाडी संदर्भात आपली चौकशी करायची आहे. याकरता तुम्ही मला भेटायला या असा विनायक शिंदे यांनी सांगितल्यानंतर मनसुख हे तावडे नावाच्या अधिकाऱ्याला भेटायला घराखाली उतरताच पुन्हा त्या तावडे नावाच्या अधिकाऱ्याचा फोन आला आणि 'घोडबंदर इथे आपण भेटूया. मी घोडबंदर दिशेने निघालो आहे तुम्हाला फोन करतो' असं विनायक शिंदे येणे मनसुख सांगितलं होतं.
त्यानुसार, मनसुख घोडबंदर येथे गेला असता विनायक शिंदे हा माणूस मनसुखला भेटला, तिथून या दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली त्यानंतर मनसुख हा तावडे म्हणजेच विनायक शिंदे सोबत गाडीत बसून निघून गेला. तो कुठे गेला याबाबत अजून तपास यंत्रणांना माहिती मिळाली नसून तपास यंत्रणा या ठिकाणांचा शोध घेत आहे.
मात्र याच दरम्यान मनसुख यांना बेशुद्ध करण्यात आलं असं सांगितलं जातं आहे. मनसुख याने त्यावेळेस घातलेले मास्क काढून त्याला दुसरा मास्क घालायला दिला गेला. त्याच मास्कमध्ये बेशुद्ध करण्याचे औषध टाकण्यात आले होते.
मनसुख यांची पत्नी विमला मनसुख यांनी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाला दिलेल्या माहितीनुसार, मनसुख 4 मार्च रात्री जेव्हा घरातून बाहेर पडले. त्यावेळेस त्यांच्या चेहर्यावर असलेला मास्क आणि त्यांचा मृतदेह सापडला, त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर असलेला मास्क हे दोन्ही मास्क वेगवेगळे आहेत. त्यामुळे नवीन मास्कमध्ये बेशुद्ध करण्याचे औषध टाकून मनसुख यांना बेशुद्ध करण्यात आले असावे, असा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला संशय होता.
मनसुख बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्या मास्कच्या आत पाच ते सहा रुमाल ठेवण्यात आले आणि त्याचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर येथील खाडीत फेकण्यात आला. त्यावेळेस शेवटपर्यंत विनायक शिंदे हा घटनास्थळी उपस्थित होता. एवढंच नाहीतर मास्क च्या आत पाच ते सहा रुमाल ठेवण्या मागचे कारण म्हणजे मनसुख यांच्या तोंडातून पाणी शरीरात हळूहळू जाईल. परिणामी भरती आल्यावर मनसुख यांचा मृतदेह पाण्याच्या खाली खोलवर राहून दूरपर्यंत वाहत जाईल, असा अंदाज हत्या करणार्यांचा होता. मात्र, असं न घडता मनसुख यांचा मृतदेह तिथं गाळातच रुतून राहिला. परिणामी ओहोटी लागल्यावर मनसुख यांचा मृतदेहवर आल्याने दिसू लागला आणि मनसुख यांच्या मृतदेह समोर आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.