Home /News /crime /

गुजरातच्या गोड गोड जेवणावर विवाहिता संतापली; पतीसह, सासू-सासऱ्याविरोधात केली पोलिसात तक्रार

गुजरातच्या गोड गोड जेवणावर विवाहिता संतापली; पतीसह, सासू-सासऱ्याविरोधात केली पोलिसात तक्रार

विवाहितेला तिखट खाण्याची इच्छा होत होती, मात्र तिला सतत गोड गोड भाज्या खाव्या लागत होत्या.

    इंदूर, 21 फेब्रुवारी : जबरदस्ती गुजराती जेवण खाऊ घातल्यावरुन मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) इंदूरच्या मुलीने आपला पती, सासू-सासऱ्यांसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इंदूरची (Indore News) मुलगी भावना त्रिवेदीचं लग्न गेल्या वर्षी गुजरातमधील औषध कंपनीच्या अकाऊंटेटंसोबत झालं होतं. तिला सासरी शिजवलं जाणारं गोड गुजराती जेवण आवडत नव्हतं. काही दिवसांनी ती गर्भवती झाल्यानंतर सासरची मंडळी तिला जबरदस्ती गोड जेवण देऊ लागले. तिने नकार केल्यास तिला मारहाणही करीत होते. यामुळे संतापून महिलेने इंदूरमध्ये वडिलांच्या घरी परतली. महिलेने सासरच्या मंडळींविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? या प्रकरणात महिलेने सांगितलं की, गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये माझं लग्न झालं होतं. काही दिवसातच मला दिवस गेले. यानंतरही माझी इच्छा नसतानाही सासरची मंडळी मला गोड जेवण जेत होते. मी खाण्यास नकार दिला. यामुळे पतीसह सासरची मंडळी माझा छळ करू लागली. इतकच नाही तर त्यांनी मला मारहाणही केली. मी अनेकदा सासरच्या मंडळींना सांगितलं की मला असं जेवण आवडत नाही. सासू आणि आत्या गुजरात जेवणासाठी माझ्यावर दबाव निर्माण करीत होती. माझ्या जेवणात दररोज साखर घातली जात होती. नकार दिला तरी सासरची मंडळी माझं ऐकत नव्हते. हे ही वाचा-10 वर्षांनी लहान मुलावर विवाहितेचं जडलं प्रेम, पळवून नेत केलं धक्कादायक कृत्य मला तिखट आणि चटपटीत खावसं वाटे, मात्र सासरची मंडळी माहेरी जाऊन हे सर्व करायला सांगत असे. ते मला मारहाण करीत होते. वैतागून शेवटी दोन महिन्यांपूर्वी मी वडिलांकडे इंदूरला आले. यानंतरही मोबाइलवर फोन करून मला धमकी दिली जात होती. माझे पती अहमदाबाद येथील एका औषध कंपनीत अकाऊंटंट आहेत, आणि सासरेदेखील नोकरी करतात. भावनाने पोलिसांना सांगितलं की, लग्नाच्या वेळी अहमदाबादहून बस वरात घेऊ इंदूरला आले होते. त्यावेळी बसच्या भाड्यावरुन वाद झाला होता. येथे वडिलांना अर्ध भाडं देऊन त्यांना शांत केलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Gujrat, Madhya pradesh

    पुढील बातम्या