मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

13 वर्षांनी लहान प्रियकरासोबत महिला फरार; जाताना घराची केली भयावह अवस्था, पती शॉक

13 वर्षांनी लहान प्रियकरासोबत महिला फरार; जाताना घराची केली भयावह अवस्था, पती शॉक

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

या महिलेचे विवाहबाह्य संबंध होते.

    इंदूर, 22 ऑक्टोबर : इंदूरमधील (Indore News) खजराना पोलीस ठाणे हद्दीत एक विचित्र प्रकार समोर आला. येथील एक 45 वर्षांची महिला बेपत्ता झाली आहे. माहिती मिळाल्यानंतर कळालं की ही महिला आपल्याहून 13 वर्षांनी लहान प्रियकरासोबत घरातून फरार झाली. जाताना महिला घरातील तब्बल 47 लाखांची कॅश आणि दागिन्यांनी भरलेली बॅग (woman took Rs 47 lakh in cash and a bag full of jewelery from the house) घेऊन गेली. महिलेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात पोलिसात (Indore Police) तक्रार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरमधील 45 वर्षांची महिला प्रेमात इतकी बुडाली की ती घरातून कॅश आणि सोन्याचे दागिने घेऊन आपल्या 32 वर्षांच्या प्रियकरासोबत फरार झाली. हैराण करणारी ही घटना इंदूरमधील हाजी कॉलनीतील आहे. येथे संभ्रांत कुटुंबातील महिला 8 दिवसांपासून बेपत्ता झाली होती. या प्रकरणात पोलिसात तक्रार देखील करण्यात आली. महिलेचं सासर आणि माहेरचं कुटुंब श्रीमंत आहे. त्यांच्याकडे कोट्यवधींच्या जमिनी आहेत. (Married Woman absconding with boyfriend who is 13 years younger in indore) महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितलं की, घरात काहीही न सांगता महिला फरार झाली. तिचा मोबाइल बंद असल्याचं कळताच त्यांना संशय आला. यानंतर त्यांनी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. शेवटी असं समोर आलं की, महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. तिचं रिक्षा चालकावर प्रेम होतं. जो तिच्याहून तब्बल 13 वर्षांनी लहान होता. ती त्याच्यासोबतच फरार झाली. हे ही वाचा-3 महिन्यांचं प्रेम अन् 20 दिवसाचा संसार, अतिशय भयावह झाला लव्ह स्टोरीचा THE END पतीने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी जमिनीचा व्यवहारातून 47 लाखांची रक्कम मिळाली होती. ती सर्व कॅश घराच्या तिजोरीत होती. तिजोरीची किल्ली महिलेजवळ होती. तिचे संधी साधली आणि कॅश, दागिने घेऊन फरार झाली. सध्या पोलीस महिला आणि तिच्या प्रियकराच्या शोधात आहे. त्यांनी मोबाइल बंद ठेवल्याने शोध घेण्यास वेळ लागत असल्याचं सांगितलं जात आहे.  
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Indore News, Madhya pradesh, Marriage

    पुढील बातम्या