पाटना, 14 फेब्रुवारी : बिहारमधील (Bihar News) केनगर पोलीस ठाणे हद्दीतील परोरामध्ये एका तरुणाला व्हेलेंटाइन डे (Valentine day 2022 ) साजरा करणं महागात पडलं आहे. याचं एका अल्पवयीन मुलीवर प्रेम होतं. kiss day च्या रात्री मुलगी आपल्या शेजारी राहणाऱ्या प्रियकराच्या घरी पोहोचली. तिने तरुणाकडे लग्न करण्याचा हट्टच धऱला. यानंतर प्रियकर तिला मंदिरात घेऊन गेला आणि प्रेयसीच्या भांगेत कुंकू भरलं. लग्नाबाबत कळताच मुलीच्या वडिलांनी तरुणाविरोधात पोलिसात तक्रार केली.
सोमवारी व्हेलेंटाइन डेला पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
जबरदस्तीने लग्न आणि अपहरणाचा आरोप...
दुसरीकडे पोलिसांनी सांगितलं की, विकास कुमारने सांगितलं की, अटक केलेला तरुण हा मुलीचा शेजारी आहे. अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासासाठी रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे. मुलीच्या वडिलांनी मुलावर आरोप केला आहे की, त्यांनी जबरदस्तीने मुलीशी लग्न केलं. आणि बाईकवरून तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा-इथे तरुण-तरुणी रात्री एकत्र राहिल्यानंतर निवडतात आयुष्याचा जोडीदार
तर दुसरीकडे आरोपी सोनू याचं म्हणणं आहे की, दोघे गेल्या 7 महिन्यांपासून एकमेकांवर प्रेम करीत आहेत. रविवारी रात्री मुलगी अचानक त्यांच्या घरी आली आणि व्हेलेंटाइन वीकमध्ये लग्न करण्याचा हट्ट करू लागली. यानंतर दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केलं. मुलीनेही सांगितलं की, तिने आपल्या इच्छेने लग्न केलं. मुलाच्या आई-वडिलांना हे लग्न मंजूर आहे. मात्र मुलीच्या पालकांनी याला नकार दर्शवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Marriage, Valentine day, Valentine week