Home /News /crime /

विवाहित तरुणाची प्रेयसीच्या घरी फाशी, कटकटीला वैतागून संपवलं जीवन

विवाहित तरुणाची प्रेयसीच्या घरी फाशी, कटकटीला वैतागून संपवलं जीवन

प्रेयसीऐवजी दुसऱ्याच मुलीसोबत लग्न झालेल्या तरुणाने प्रेयसीच्या कटकटीला वैतागून (Married person hanged himself to death in the girlfriend's house) अखेर तिच्याच घरी फाशी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    जयपूर, 25 सप्टेंबर : प्रेयसीऐवजी दुसऱ्याच मुलीसोबत लग्न झालेल्या तरुणाने प्रेयसीच्या कटकटीला वैतागून (Married person hanged himself to death in the girlfriend's house) अखेर तिच्याच घरी फाशी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणाचं त्याच्या शेजारीच राहणाऱ्या मुलीवर (Love affair) प्रेम होतं. दोघांनाही एकमेकांशी लग्न (wanted to marry each other) करण्याची इच्छा होती. मात्र तरुणाचं वेगळ्याच मुलीसोबत लग्न झाल्यामुळे दोघांमध्ये वाद होत होते. या वादांना कंटाळून तरुणाने प्रेयसीच्या घरी जाऊन आत्महत्या केली. प्रेमप्रकरणात निराशा राजस्थानच्या बारां शहरात राहणाऱ्या राजकुमारचं सोनिया नावाच्या मुलीवर प्रेम होतं. काही वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते आणि दोघांनाही एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा होती. मात्र काही कारणामुळे हे लग्न होऊ शकलं नाही. राजकुमारच्या कुटुंबीयांनी वेगळ्याच मुलीसोबत त्याचं लग्न लावून दिलं. त्यामुळे राजकुमार आणि सोनिया यांच्यात वाद व्हायला सुरुवात झाली. वाद गेले विकोपाला रोज होणाऱ्या या वादांना राजकुमार वैतागला होता. 21 सप्टेंबरला पुन्हा या दोघांमध्ये फोनवरून जोरदार वाद झाले. त्यानंतर रात्री 12 वाजता राजकुमार आपल्या घरातून बाहेर पडला आणि सोनियाच्या घरी गेला. तिथे झालेल्या वादानंतर सोनियाच्याच घरात त्याने स्वतःला गळफास लावून घेतला. या घटनेनंतर सोनिया आणि तिच्या कुटुंबीयांनी राजकुमारच्या कुटुंबीयांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांत तक्रार घटना समजल्यावर धक्का बसलेल्या राजकुमारच्या वडिलांनी सोनिया आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हादेखील तिच्यावर दाखल करण्यात आला आहे. हे वाचा - काय चाललंय काय? केवळ चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलाला वीजेचा शॉक सोनियाने धमकी दिल्याची माहिती राजकुमारचं लग्न झाल्यानंतर त्याचे सतत सोनियाशी वाद होत होते. आपल्यासोबत लग्न केलं नाही, तर पोलीस कारवाई करण्याची धमकी सोनियाने दिली होती. त्यामुळे राजकुमार वैतागला होता. सतत धमक्या देऊन आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी सोनियाला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Love story, Rajasthan

    पुढील बातम्या