मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पत्नी माहेरी जाताच पतीनं बांधली प्रेयसीसोबत लग्नगाठ; बायकोनं सासर गाठलं अन्...

पत्नी माहेरी जाताच पतीनं बांधली प्रेयसीसोबत लग्नगाठ; बायकोनं सासर गाठलं अन्...

महिला आणि पुरुषांच्या वागणूकीवर नुकतंच एक संशोधन करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँड युनिवर्सिटीच्या (University of Queensland,Australia)संशोधकांनी हे संशोधन केलं आहे.

महिला आणि पुरुषांच्या वागणूकीवर नुकतंच एक संशोधन करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँड युनिवर्सिटीच्या (University of Queensland,Australia)संशोधकांनी हे संशोधन केलं आहे.

एका विवाहित महिलेनं आपल्या पतीचं दुसरं लग्न (Married Man Ties Knot With Girlfriend) झाल्याचं समजताच एकच गोंधळ घातला आहे. विवाहिता आपल्या नातेवाईकांसोबत घरी पोहोचली असता सासरकडच्या मंडळींनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली

  • Published by:  Kiran Pharate

जयपूर 13 जुलै : एका विवाहित महिलेनं आपल्या पतीचं दुसरं लग्न (Married Man Ties Knot With Girlfriend) झाल्याचं समजताच एकच गोंधळ घातला आहे. विवाहिता आपल्या नातेवाईकांसोबत घरी पोहोचली असता सासरकडच्या मंडळींनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिच्या वडिलांना घरात बंद करून ठेवलं. ही घटना राजस्थानच्या (Rajasthan) धौलपूर जिल्ह्यातील कोतवाली ठाण्याच्या क्षेत्रातील आहे. याठिकाणी महिलेनं केलेला गोंधळ ऐकून आसपासचे लोकही जमा झाले.

आगीत उडी घेत महिलेला वाचवून ठरला हिरो; घटनेत आलेल्या ट्विस्टनं पोहोचला गजाआड

लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना (Police) दिली मात्र पोलीस याठिकाणी पोहोचण्याआधीच पती घरातून फरार झाला. पोलिसांनी महिलेला समजावून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यातील दत्तपुरा येथील अनुराधा मौर्य हिचं लग्न 2010 साली धौलपुर जिल्ह्यातील कोतवाली ठाण्याच्या किरी मोहल्ला येथील रहिवासी वीरेंद्र सिंह याच्यासोबत झालं होतं. या दोघांना दोन मुलंही आहेत.

दीपिकाच्या गाण्यावर आजीबाईंचा धम्माल डान्स VIDEO; उत्साह पाहून व्हाल थक्क

2016 पासून अनुराधा आपल्या दोन मुलांसह माहेरी राहत आहे, कारण अनुराधाचा पती वीरेंद्र याचे पुजा उर्फ संगीता नावाच्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. तीन महिन्यांपूर्वी त्यानं पुजासोबत लग्नगाठ बांधली. याबाबत अनुराधाला माहिती होताच सोमवारी ती आपल्या नातेवाईकांसोबत सासरी पोहोचली आणि तिनं एकच गोंधळ घातला.

महिलेनं घातलेला हा गोंधळ पाहता याठिकाणी आसपासचे लोकही जमा झाले. पोलिसांनी सांगितलं, की विरेंद्र आणि अनुराधा दोघंही पती-पत्नी आहेत. 2010 मध्ये या दोघांचं लग्न झालं होतं. दोघांमध्ये वाद झाले होते. सध्या अनुराधानं हुंडा आणि मेन्टेनंससाठी केस केली आहे आणि कोर्टात सध्या कारवाईही सुरू आहे.

First published:

Tags: Crime news, Rajsthan