मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

लग्नाच्या पाचव्या दिवशी नववधू पळाली, दिव्यांग तरुणाला दलालांकडून लाखोंचा गंडा

लग्नाच्या पाचव्या दिवशी नववधू पळाली, दिव्यांग तरुणाला दलालांकडून लाखोंचा गंडा

एका दिव्यांग (Handicap) तरुणाचं लग्न (Marriage) झाल्यानंतर पाचव्या दिवशी वधू पळून (wife ran away) गेली.

एका दिव्यांग (Handicap) तरुणाचं लग्न (Marriage) झाल्यानंतर पाचव्या दिवशी वधू पळून (wife ran away) गेली.

एका दिव्यांग (Handicap) तरुणाचं लग्न (Marriage) झाल्यानंतर पाचव्या दिवशी वधू पळून (wife ran away) गेली.

  • Published by:  desk news

जयपूर, 5 ऑगस्ट : एका दिव्यांग (Handicap) तरुणाचं लग्न (Marriage) झाल्यानंतर पाचव्या दिवशी वधू पळून (wife ran away) गेली. काही दलालांनी लग्नाच्या नावाखाली आपली फसवणूक (Cheating) केल्याचं लक्षात येताच तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली. या लग्नासाठी दिव्यांग तरुणाच्या कुटुंबीयांनी मॅरेज ब्युरोत (Marriage beauro) 2.5 लाख रुपये भरले होते. मात्र लग्नानंतर या तरुणाला एक अज्ञात फोन आला आणि त्याचे ज्याच्याशी लग्न झाले आहे, ती आपली पत्नी असल्याचं त्यानं सांगितलं. 5 लाख रुपये दिले नाहीत, तर बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकीही तरुणाला देण्यात आली.

असा घडला प्रकार

ही घटना आहे राजस्थानच्या जयपूरमधील. आपल्या दिव्यांग भावाचं लग्न ठरवण्यासाठी त्याच्या बहिणीनं बनीपूर भागातील गीता देवी यांच्या मॅरेज ब्युरोमध्ये त्याचं नाव नोंदवलं होतं. त्यांनी या तरुणाचं लग्न जमवण्याचं आश्वासन दिलं. लग्नासाठी उत्तर प्रदेशातील एक स्थळ त्यांनी सुचवलं. भंवर नावाच्या दलालाच्या मध्यस्थीनं ही बोलणी करण्यात आली. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलीची परिस्थिती गरीब असल्यामुळे लग्नच्या तयारीसाठी भंवरनं कुटुंबाकडून 2.5 लाख रुपये घेतले आणि लग्न पार पडलं.

लग्न झाल्यानंतर पाच दिवसांनी तरुणाला धमकीचे फोन येऊ लागले. चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार त्याच्या पत्नीने धर्मांतर करून हिंदू पद्धतीने लग्न केल्याची बाब समोर आली. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही महिला आपली पत्नी असल्याचा दावा करत पैशांची मागणी केली. हे सगळं घडत असताना पाचव्या दिवशी या तरुणाची पत्नी घर सोडून पळून गेली.

हे वाचा -

लग्न झाल्यामुळे आनंदी असलेल्या या परिवारावर अचानक संकटांचा डोंगर कोसळला. कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या गीता देवी आणि दलाल भंवर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अडीच लाख रुपये घेऊन दलाल फरार असल्याचं कळतंय. तर मॅरेज ब्युरोनं दलालाशी आपला संबंध नसल्याचं सांगत हात वर केलेत. पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Marriage, Rajasthan