मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

तुंबळ हाणामारी! PUBLIC TOILET वरून दोन गटांत जोरदार राडा, अनेकांची फुटली डोकी

तुंबळ हाणामारी! PUBLIC TOILET वरून दोन गटांत जोरदार राडा, अनेकांची फुटली डोकी

सार्वजनिक शौचालयाच्या वापरावरून दोन (Many injured after fight in two groups over public toilet) गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

सार्वजनिक शौचालयाच्या वापरावरून दोन (Many injured after fight in two groups over public toilet) गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

सार्वजनिक शौचालयाच्या वापरावरून दोन (Many injured after fight in two groups over public toilet) गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर : सार्वजनिक शौचालयाच्या वापरावरून दोन (Many injured after fight in two groups over public toilet) गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. पब्लिक टॉयलेटचा वापर करण्याच्या मुद्द्यावरून दोन गट आमनेसामने आले आणि (Fight between two groups) त्यांच्यात तुंबळ हाणामारीला सुरुवात झाली. लोकांनी हाताला लागेल ती वस्तू घेत एकमेकांवर (People attacked each other) हल्ला चढवला. पोलिसांना हे भांडण सोडवता सोडवता नाकी नऊ आले.

असा पेटला वाद

दिल्लीतील गीता कॉलनी परिसरात नव्याने काही सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली आहेत. या भागात राहणाऱ्या बुद्ध बाजार झोपडपट्टीतील नागरिक त्यांचा वापर करत असतात. मात्र लोकसंख्येच्या मानाने टॉयलेटची संख्या कमी असल्यामुळे इथं नंबर लावण्यावरून सतत नागरिकांमध्ये छोटीमोठी भांडणं होत असतात. यासाठी नंबर लावण्याच्या मुद्द्यावरून वाद झाल्यानंतर दोन गट आमनेआमने आले आणि त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. लाठ्या, काठ्या, रॉड, बाटल्या आणि हाताशी लागेल त्या वस्तू घेऊन दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले. पोलिसांना याची खबर लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांची झाली दमछाक

टॉयलेटच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांतील नागरिक इतके आक्रमक झाले होते की त्यांची भांडणं सोडवता सोडवता पोलिसांच्या अक्षरशः नाकी नऊ आले. गर्दीतील प्रत्येकजण रागावलेला होता आणि पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत करण्याअगोदर हल्ला करून बदला घेण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने जमावाला इशारा देत शांत केले आणि त्यानंतर हा गोंधळ थांबला.

दोन्ही बाजूंचे नागरिक जखमी

या हाणामारीत अनेक नागरिक जखमी झाले आहेत. दोन्ही गटातील साधारण पाच ते सहाजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करायला सुरुवात केली असून यातील आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

हे वाचा - धक्कादायक! व्यक्तीनं 75 मुलींसोबत केलं लग्न; या विचित्र कामासाठी करायचा वापर

राजस्थान विरुद्ध युपी

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या झोपडपट्टीत राजस्थानी नागरिक विरुद्ध उत्तर प्रदेशचे नागरिक असे दोन गट तयार झाले आहेत. कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून त्यांच्यात सतत हाणामाऱ्या होत असतात.

First published:

Tags: Crime, Delhi