मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

ब्रेथ अ‍ॅनालायझर टेस्टमध्ये एअरपोर्टवरचे 12 कर्मचारी दोषी, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

ब्रेथ अ‍ॅनालायझर टेस्टमध्ये एअरपोर्टवरचे 12 कर्मचारी दोषी, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

कामावर असलेले विमानतळ चालक, अग्निशमन कर्मचारी, तसंच विमानाची देखभाल करणारे एकूण 12 कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत (Drunked Airline Staff) आढळले होते. यामध्ये इंडिगो, तसंच देशातली सर्वांत मोठी एअरलाइन्स कंपनी असलेली स्पाइसजेट आणि इंडियन ऑइलच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 09 एप्रिल: एअरपोर्ट कर्मचाऱ्यांबाबतची एक धक्कादायक बातमी आहे. नागरी उड्डाण महासंचलनालयानं (Civil Aviation) दिल्ली विमानतळावर जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांमध्ये एक महत्त्वाची तपासणी केली होती. यामध्ये एअरपोर्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यात कामावर असलेले विमानतळ चालक, अग्निशमन कर्मचारी, तसंच विमानाची देखभाल करणारे एकूण 12 कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत (Drunked Airline Staff) आढळले होते. यामध्ये इंडिगो, तसंच देशातली सर्वांत मोठी एअरलाइन्स कंपनी असलेली स्पाइसजेट आणि इंडियन ऑइलच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता अशी माहिती आहे. साहजिकच यामुळे विमानाची उड्डाणं आणि एकूणच हवाई वाहतुकीबद्दलची चिंता अधिक वाढली आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. या तपासणीत विमान उड्डाणाच्या काही वेळ आधीच पायलटही नशेत आढळल्यामुळे नक्कीच काळजी जास्त वाढली आहे.

गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात विमान उड्डाणांसंदर्भातल्या धोरणांमध्ये (Change In Aviation Policy) बदल करण्यात आले होते. त्यानुसार एअरपोर्टवरच्या विविध विभागांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ब्रेथ अ‍ॅनालायझर टेस्ट करण्यात येणार आहे. देखभाल करणारे कर्मचारी किंवा कॉकपिटमध्ये ऑडिट, ट्रेनिंगसारख्या कारणासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ब्रेथ अ‍ॅनालायझर टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. त्याशिवाय बॅगेज कार्टचे चालक, लोडर्स, पुश-बॅक ऑपरेटर्स आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतीय एअरपोर्टची सुरक्षा जागतिक दर्जाच्या बरोबरीने आणण्यासाठी हे पाऊल आपल्या देशात उचलण्यात आलं आहे. रक्तात अल्कोहोलचं प्रमाण शून्य आढळलं, तरीही अल्कोहोलचा परिणाम जवळपास 36 तास शरीरावर राहतो असं गेल्या वर्षींच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे या तपासणीदरम्यान दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचीही शक्यता आहे.

सर्वात जास्त कारखाने तर अजित पवारांनी...; पंकजा मुंडेंची उपमुख्यमंत्र्यावर टीका

या प्रकरणी दोषी आढळल्यास व्यक्तीला निलंबितही केलं जाऊ शकतं, असं या प्रकरणाशी संबधित एका व्यक्तीनं सांगितलं आहे. तीच व्यक्ती दुसऱ्या वेळेस पुन्हा त्याच अवस्थेत आढळली तर त्या व्यक्तीचा एअरपोर्टवर काम करण्याचा परवाना रद्द होऊ शकतो. जानेवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरूच होता. त्यामुळे काही औषधांमुळे ब्रेथ अ‍ॅनालायझर टेस्टमध्ये काही कर्मचारी दोषी आढळले असतील; मात्र प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व नियमांचं काटेकोर पालन केलं जातं, असं इंडिगो कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

ज्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर आपण बिनधास्तपणे आकाशात उड्डाण घेतो, त्या कर्मचाऱ्यांचे पाय नशेमुळे जमिनीवर राहत नसतील तर ही नक्कीच गंभीर बाब आहे.

First published:

Tags: Airport