मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मूल होण्यासाठी मांत्रिकाकडे जात होते पती-पत्नी, भयंकर सत्य समोर आल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली

मूल होण्यासाठी मांत्रिकाकडे जात होते पती-पत्नी, भयंकर सत्य समोर आल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली

पिडीत महिलेनं पोलिसांना सांगितलं की, रात्री-अपरात्री चिल्का बाबा तिच्या पतीला खोलीबाहेर झोपण्यास सांगायचा आणि भूत पळवून लावण्याच्या बहाण्याने महिलेला खोलीत घेऊन जायचा. यानंतर बाबा प्रसादच्या नावाखाली तिला गुंगी आणणारा पदार्थ खायला द्यायचा.

पिडीत महिलेनं पोलिसांना सांगितलं की, रात्री-अपरात्री चिल्का बाबा तिच्या पतीला खोलीबाहेर झोपण्यास सांगायचा आणि भूत पळवून लावण्याच्या बहाण्याने महिलेला खोलीत घेऊन जायचा. यानंतर बाबा प्रसादच्या नावाखाली तिला गुंगी आणणारा पदार्थ खायला द्यायचा.

पिडीत महिलेनं पोलिसांना सांगितलं की, रात्री-अपरात्री चिल्का बाबा तिच्या पतीला खोलीबाहेर झोपण्यास सांगायचा आणि भूत पळवून लावण्याच्या बहाण्याने महिलेला खोलीत घेऊन जायचा. यानंतर बाबा प्रसादच्या नावाखाली तिला गुंगी आणणारा पदार्थ खायला द्यायचा.

पुढे वाचा ...

मधेपुरा, 8 मे : सध्याच्या काळात अनेक जोडप्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे मूल न होण्याच्या समस्येचा (infertility problems in couples) सामना करावा लागत आहे. स्वतःचं मूल असावं अशी खूप इच्छा असणारी जोडपी अनेक लोकांचे, डॉक्टरांचे सल्ले घेऊन विविध उपाय करत असतात. मात्र, अनेकजण अज्ञानामुळे किंवा पैशांच्या अडचणींमुळे डॉक्टरांकडे जाऊन उपचार न घेता नको त्या बुवाबाजीच्या (blind belief) मागे लागतात. अशा लोकांचा बुवा-बाबा, मांत्रिक-तांत्रिक गैरफायदा घेत असतात. यामुळे अनेकदा आर्थिक नुकसानासह इतर प्रकारच्या मनस्तापाला सामोरं जावं लागतं.

अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मूल मिळण्याची हमी देणारा बाबा महिलांवर बलात्कार (rape) करत असल्याचं समोर आलं आहे. बाबा मूल-बाळ नसलेल्या स्त्रियांचा गैरफायदा घेत होता. त्यांना जप आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली बंद खोलीत नेऊन त्यांच्यावर बलात्कार करायचा. जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत आल्यास त्याची झोपण्याची व्यवस्था खोलीच्या बाहेर केली जात असे.

हे प्रकरण बिहारमधील (bihar crime news) मधेपुरा जिल्ह्यातील आहे. आलमनगर पोलीस स्टेशन हद्दीतील भागीपूर गावात हा चिल्का बाबा राहात होता. त्याच्यावर पूर्णिया जिल्ह्यातील एका जोडप्याने आलमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडित दाम्पत्यानं सांगितलं की, लग्नाला अनेक वर्षं उलटूनही त्यांना मूल होत नव्हतं. यादरम्यान गावातील एका महिलेनं त्यांना चिल्का बाबा उर्फ ​​कैलाश पासवानबद्दल सांगितलं. बाबाच्या मंत्र-तंत्रांमुळे आपल्याला दोन मुली झाल्याचं महिलेनं दाम्पत्याला सांगितलं. मग पती-पत्नी दोघेही त्याच्याकडे गेले आणि त्याच्या बोलण्याला फसून भागीपूरमध्ये या बाबाकडे वारंवार जाऊ लागले.

हे वाचा - मैत्रीच्या नात्याला काळिमा, अधिकाऱ्याचा मित्राच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पिडीत महिलेनं पोलिसांना सांगितलं की, रात्री-अपरात्री चिल्का बाबा तिच्या पतीला खोलीबाहेर झोपण्यास सांगायचा आणि भूत पळवून लावण्याच्या बहाण्याने महिलेला खोलीत घेऊन जायचा. यानंतर बाबा प्रसादच्या नावाखाली तिला गुंगी आणणारा पदार्थ खायला द्यायचा आणि बेशुद्ध पडल्यावर तिच्यावर बलात्कार करायचा. गुंगी चढल्यामुळे महिला व तिच्या पतीला काही समजू शकले नाही. अनेक महिन्यांपासून भूत-प्रेताच्या नावाखाली बाबा जोडप्याला आपला शिकार बनवत होता.

बुधवारी रात्रीही बाबांनी महिलेला फोन करून बोलावून घेतलं. इतर दिवसांप्रमाणे त्या रात्रीही त्याने असंच केलं. मात्र, महिलेच्या पतीला जाग आली. तेव्हा आपले हातपाय बांधल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने कसेतरी स्वतःचे हातपाय उघडले आणि बाबांच्या खोलीत डोकावून पाहिले. तर, बाबा आपल्या पत्नीवर बलात्कार करत असल्याचा धक्कादायक प्रकार त्याला दिसला. हे पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने लगेच आत धाव घेत आपल्या पत्नीला वाचवलं.

हे वाचा - शाळेत न येता फुकटाचा पगार घेत होती मुख्याध्यापिका, 5000 रुपयांत एका मुलीला ठेवलं

यानंतर पतीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तेव्हा चिल्का बाबाने दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि नंतर तो तेथून पळून गेला. चिल्का बाबाने पंजाबमधील महिलांसोबतही असाच प्रकार केल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरून मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. पण काहीच कारवाई झाली नव्हती.

याप्रकरणी एसपी राजेश कुमार म्हणाले की, पीडित दाम्पत्याच्या तक्रारीवरून आलमनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लवकरच ढोंगी बाबाला अटक करण्यात येईल. बाबा यापूर्वीही तुरुंगात गेल्याचं सांगण्यात येत आहे.

First published:

Tags: Bihar, Crime news, Rape