Home /News /crime /

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाला नवे वळण, धक्कादायक माहिती आली समोर

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाला नवे वळण, धक्कादायक माहिती आली समोर

. मनसुख यांच्या पत्नी विमला यांनीही मनसुख यांची हत्या झाली असवी असा दावा त्याच्या जबाबात केला आहे.

ठाणे, 10 मार्च : मनसुख हिरेन  (mansukh hiren death case) यांची हत्या झाली की आत्महत्या केली, याचा तपास सुरू असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.  मनसुख हिरने जेव्हा घरातून निघाला तेव्हा त्याच्याकडे सोन्याचे दागिने (Gold chain) आणि रोख रुपये होते. मात्र, मृतदेह सापडला तेव्हा दागिने आणि पैसे गायब होते. मनसुख हिरेन जेव्हा घरातून बाहेर पडले होते. तेव्हा त्यांच्या गळ्यात दीड तोळ्याची सोन्याची चैन होती. हातात पुष्करज ची सोन्याची अंगठी होती, काही रोख रक्कम व पाच ते सहा कंपनीचे डेबिट व क्रेडिट कार्ड होते. जेव्हा त्यांचा मृतदेह सापडला होता तेव्हा घटनास्थळी या सर्व गोष्टी गायब होत्या, त्यामुळे मनसुख यांची हत्या झाली असावी असा संशय वाढत चालला आहे. मनसुख यांच्या पत्नी विमला यांनीही मनसुख यांची हत्या झाली असवी असा दावा त्याच्या जबाबात केला आहे. अखेर शरद पवारांची एंट्री, भाजपला उत्तर देण्यासाठी अजितदादांना दिली सूचना दरम्यान, मुंबईतल्या दक्षिण मुंबई येथे स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा तपास एनआयए (NIA) आपल्या हाती घेतल्यानंतर एनआयए तात्काळ कामाला लागली आहे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयए स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या तपासात संदर्भात मुंबई आणि ठाणे याठिकाणी धाडी टाकत असून एनआयएची एक टीम मनसुख यांच्या घरी ठाण्यात दाखल झाली आहे. स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी संदर्भात हिरेन मनसुख यांची पत्नी विमला मनसुख यांनी दिलेल्या एटीएसला तक्रारीनंतर या तक्रारीत विमला मनसुख यांनी जे आरोप केलेत त्यासंदर्भात चौकशी करण्याकरता एनआयएची टीम ठाण्यात दाखल झाली आहे. महाराणा प्रतापांची प्रतिमा पदाधिकाऱ्यांच्या पायाशी,भाजपच्या कार्यक्रमातील प्रकार तर दुसरीकडे हिरेन मनसुख यांची हत्या कशी झाली त्यांना कसे मारण्यात आलं त्यांचा मृतदेह कसा मुंब्र्यातील रेती बंदर येथे फेकण्यात आला याच याचा शोध घेण्याकरता महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) तीन टीम देखील ठाण्यात दाखल झाल्या असून ठाण्यात ज्या ठिकाणी हिरेन यांचा मृतदेह सापडला होता त्या ठिकाणी रिक्रिएशन करून या तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतात का याचा तपास एटीएस करणार आहे. एटीएसचे अप्पर पोलीस आयुक्त शिवदीप लांडे हे या संपूर्ण टीमला मार्गदर्शन करणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या