ठाणे, 20 मार्च : मनसुख हिरेन मृत्यू (Mansukh Hiren Death Case) प्रकरणाचा तपास सुरू असताना मुंब्य्रात धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या ठिकाणी मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. त्याच ठिकाणी आणखी एक मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुंब्रा खाडीजवळ रेती बंदर इथं आज सकाळी एक अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. स्थानिकांनी मृतदेह आढळून आल्याची माहिती तातडीने मुंब्रा पोलिसांना दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस मुंब्रा खाडी किनाऱ्यावर पोहोचले आहे.
खेडमधील लोटे एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट, 3 कामगारांचा मृत्यू
स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही व्यक्ती बाजूलाच असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी राहते. तो शौचालयाला खाडीकिनारी आला असावा, त्यावेळी खाडीत पडून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या मृतदेहाची सोबत आधार कार्ड पॅन कार्ड सापडले आहे. त्यावरून मुंब्रा पोलीस त्याच्या कुटुंबाचा शोध घेत आहे.
सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री, औषधांच्या किमतीमध्ये एप्रिलपासून मोठी वाढ!
दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एटीएस तपास करत असून सचिन वाझे विरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने केला आहे. सचिन वाझे यांचा मनसुख हत्येत हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
सचिन वाझेंचा प्रथम दर्शनी हत्या प्रकरणात सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे सचिन वाझेंचा ताबा मिळावा अशी मागमी एटीएसने ठाणे न्यायालयात केली आहे. एटीएसने 4 पाणी अहवालात न्यायालयात सादर केला होता. तसंच NIA कोर्टातून सचिन वाझे यांचा ताबा मिळावा या करता ATS ने ठाणे कोर्टातून परवानगी मिळवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Hiren mansukh, Mumbai, Murder