मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रेमविवाह करून आणलेल्या पत्नीशी पतीचं धक्कादायक कृत्य, वाशिम हादरलं

प्रेमविवाह करून आणलेल्या पत्नीशी पतीचं धक्कादायक कृत्य, वाशिम हादरलं

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

तिने प्रेमासाठी हात धरला पण त्याने घात केला, प्रेमविवाह करून आलेल्या महिलेसोबत धक्कादायक घटना

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मानोरा : प्रेमाला कलंक लावणारी एक धक्कादायक घटना मानोरा भागात घडली आहे. हा सात जन्म माझी चांगली साथ देईल असा आंधळा विश्वास तिने ठेवला आणि सगळंच संपलं. तिने प्रेमविवाह केला मात्र ती फसली. तिला त्याची वाईट शिक्षा मिळाली.

प्रेम विवाह झाल्यानंतर सुरुवातीचे काही महिने खूप चांगले गेले. मात्र हळूहळू दिवस जसे पुढे जाऊ लागले तसे नवऱ्याचे खरे रंग समोर आले. पतीकडून पैशांसाठी शारीरिक आणि मानसिक छळ होऊ लागला. मारहाण होऊ लागली. दारू पिऊन आल्यानंतर तो मारू लागला. पतीच्या जाचाला कंटाळून पत्नी माहेरी गेली.

पुण्यात उपचारादरम्यान कैद्याचा मृत्यू, रेल्वे पोलिसांच्या मारहाणीने जीव गेल्याचा नातेवाईकांचा आरोप

अखेर पत्नीचा संयम सुटला आणि तिने २३ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माधुरी चौधरी असं फिर्याद देणाऱ्या महिलेचं नाव आहे. तिने प्रेम विवाह केला. सुरुवातीचे दिवस खूप चांगले गेले. त्यांना एक गोंडस मुलगीही झाली. त्यानंतर पतीचं वागणं हळूहळू बदललं.

पती हुंड्यासाठी त्रास देऊ लागला. २ लाख रुपये आण अशी धमकी देऊ लागला. त्याने जीवे मारण्याचीही धमकी दिल्याचं फिर्यादीने म्हटलं आहे. अखेर पीडित महिला मुलीसोबत आपल्या माहेरी आली. पतीने मुलीला गोडीगुलाबीने आपल्यासोबत पुन्हा घरी नेलं. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

पीडित महिलेनं अखेर न्यायासाठी पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांनी फिर्यादी महिलेची तक्रार ऐकून घेतली आणि आरोपी पती विरोधात हुंडा अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

First published:

Tags: Crime news, Washim