Home /News /crime /

भयंकर! आंब्यावरुन गावात राडा; पुतण्यांनी काकालाच गोळी घालून संपवलं

भयंकर! आंब्यावरुन गावात राडा; पुतण्यांनी काकालाच गोळी घालून संपवलं

आंब्यासारख्या गोष्टीवरुन एका व्यक्तीचा जीव जाणं, ही भयंकर घटना आहे.

    लखनऊ, 14 मे : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) बरेली येथील जुनई गावात आंब्यावरुन एका वयस्क व्यक्तीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आंब्याच्या बागेची काळजी घेणारे मान सिंह यांना त्यांच्याच दोन पुतण्यांनी गोळी मारून हत्या केली. पोलिसांनी मृत व्यक्तीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. हत्याच्या आरोपाखाली दोन्ही भाच्यांना अटक केली आहे. 63 वर्षीय मानसिंह आंब्याच्या बागेची काळजी घेत होता. दोघे पुतणे दारूच्या नशेत आले आणि काकाला त्रास देत होते आणि बागेतून आंबे तोडून घेऊन जात होते. काकाने विरोध केला तर त्याने पुतण्यांनी जबर मारहाण केली. यानंतर अवैध बंदुकीने काकाला गोळी घालून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर दोघेही घटनास्थळाहून फरार झाले. गोळीच्या आवाजानंतर शेजारच्यांनी पाहिलं तर मान सिंह रक्ताने माखलेल्या अवस्थेत होता. त्यावेळी स्थानिकांनी पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या दोन्ही पुतण्यांना अटक करण्यात आली असून चौकशी करण्यात येत आहे. दोघांनीही आपला गुन्हा कबुल केला आहे. आता पोलीस दोघांविरोधात कायदेशीर कारवाई करीत आहे. आंब्यासारख्या एका छोट्याशा गोष्टीवरुन एका व्यक्तीचा जीव गेला. जीव घेणारे दोघेही व्यक्तीचे पुतणे होते. या कृत्यामुळे गावभरात खळबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे बंदुकीसारखे शस्त्र उपलब्ध होत असल्याने भीती अधिक वाढली आहे. .

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Uttar pradesh

    पुढील बातम्या