मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

महाराष्ट्रातला सर्वात मोठा दरोडा, तब्बल 7 कोटीचं सोनं केलं गायब

महाराष्ट्रातला सर्वात मोठा दरोडा, तब्बल 7 कोटीचं सोनं केलं गायब

 ज्वेलर्समध्ये असलेल्या तिजोरीला गॅस कटरच्या सहाय्याने कापून साधारण 14 किलो सोन व 60 लाख रूपये असा एकूण अंदाजे सात कोटी 50 लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला.

पालघर, 30 जानेवारी : पालघर (Palghar) जिल्ह्यातील बोईसर (boisar) शहरात राज्यातील सर्वात मोठ्या दरोड्याची घटना समोर आली आहे.  बोईसर शहरातील चित्रालय भागात असलेल्या मंगलम ज्वेलर्समध्ये (mangalam jewellers boisar) चार ते पाच चोरट्यांनी दरोडा टाकला असून तब्बल 7 कोटींपेक्षा जास्त रुपयांचे सोने लंपास केले आहे. या घटनेमुळे बोईसरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी 30 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास मंगलम ज्वेलर्स दुकानाच्या इमारतीमध्ये वरच्या बाजूला असलेल्या सिस्टम फॉर सक्सेस या ऑफिसच्या शटरची पट्टी तोडून चोरट्यांनी ऑफिसमध्ये प्रवेश केला. त्या ऑफिसला लागून असलेल्या ज्वेलर्सच्या भिंतीला होल पाडून ज्वेलर्समध्ये असलेल्या तिजोरीला गॅस कटरच्या सहाय्याने कापून साधारण 14 किलो सोन व 60 लाख रूपये असा एकूण अंदाजे सात कोटी 50 लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. इमारतीमध्ये नवीन आलेला वॉचमन फरार असून त्यावर संशय व्यक्त केला जात आहे. मुलाच्या प्रेमविवाहाची सूनेला शिक्षा, मित्राच्या मदतीने सासऱ्याने केला खून ज्वेलर्स दरोडा पडलेली इमारत व येथील एका हॉटेल भागात असलेला वॉचमन गावाला गेल्याने गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी नवीन वॉचमन कामावर रूजू झाला होता. या वॉचमनची कोणत्याही प्रकारची चारित्र्य पडताळणी करण्यात आली नसून सोसायटीने त्यांची कोणत्याही प्रकारची माहिती घेतली नव्हती. याठिकाणी असलेल्या एका हॉटेल मालकाने तात्पुरता आलेल्या वॉचमनकडून त्यांचे ओळखपत्रांची छायांकित प्रत घेतल्याने हा वॉचमन नेपाळ येथील असल्याचे दिसून आले असून वॉचमन फरार आहे. बोईसर- तारापूर मुख्य रस्त्या लगत असलेल्या मंगलम ज्वेलर्स दुकानाच्या मागच्या बाजूला काही अंतरावर उपविभागीय पोलीस कार्यालय असून बाजूला 100 मिटर अंतरावर पोलीस चौकी आहे. अशा भागात जबरी चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असून पोलिसांनी जोमाने तपास सुरू केला आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या