महिला खातेदार पडली बँक मॅनेजरच्या प्रेमात, लग्नाला नकार देताच...

आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं सिंडिकेट बँकेत खातं होतं. त्यामुळे बँकेत वरचेवर येणं वाढू लागलं आणि मॅनेजरवर प्रेम जडलं.

News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2019 01:23 PM IST

महिला खातेदार पडली बँक मॅनेजरच्या प्रेमात, लग्नाला नकार देताच...

मथुरा, 20 ऑक्टोबर:उत्तर प्रदेशातील मथुरा इथे एका तरुणीने विष घेऊन जीवन संपल्याची धक्कादायक घटना घडली. प्रेमात धोका मिळाल्यानं तरुणीनं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरणार आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोसीकला पोलीस हद्दीतील हे प्रकरण आहे. तरुणीचं सिंडिकेट बँकेत खात होतं. बँकेतील खात्याचं काम करण्यासाठी तरुणी बँकेत जात असे. मात्र तरुणीचं बँकेत जाणं वरचेवर वाढू लागलं.

सिंडिकेट बँकेच्या शाखा प्रमुख अजय यादवसोबत तिची मैत्री झाली. याच दरम्यान दोघांमध्ये भेटीगाठी वाढू लागल्या आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अजय यादवने लग्नाचं खोटं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोपही तरुणीच्या कुटुंबियांनी केला आहे.

लग्न होऊनही अजय यादवनं तरुणीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात

आरोपी अजय यादवचं लग्न झालं होतं तरीही त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. त्याने तरुणीला फसवलं आणि लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा तरुणीला अजय यादवचं लग्न झाल्याचं समजलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. रंगवलेल्या स्वप्नांची एका क्षणात माती झाली. आपल्याला पद्धतशीरपणे फसवलं गेलं आहे हे लक्षात येताच पीडित तरुणीने अजय यादवला जाब विचारला. त्यानंतर त्यांच्यात बराच वेळ वाद झाला आणि त्या वादानंतर तरुणीनं टोकाचं पाऊल उचललं. तरुणीनं विष घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान पीडित तरुणीचा मृत्यू झाला आहे.

Loading...

या प्रकरणी कुटुंबियांनी अजय यादव विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. लग्नाचं आमिष दाखवणं, खोटं बोलून फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अजय फरार असून पोलिसांकडून सध्या त्याचा तपास सुरू आहे.

VIDEO : परळीपासून ते वरळी 'या' आहे राज्यातील बिग फाईट्स, कोण मारणार बाजी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2019 01:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...